
Benefits of eating with hands ayurveda : अनेक देशातील लोक आजही हाताने जेवण करणं पसंत करतात. हाताने जेवणे हेल्दी आणि नैसर्गिक पद्धत असल्याचं म्हटलं जातं. पण ही फक्त एक सवय आहे की यामागे काही सायन्स लपलं आहे, याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडला असेल. घराबाहेर गेल्यानंतर काही लोक हॉटेलमध्ये जेवतात. त्यावेळी इतर लोकांची संस्कृती पाहून हाताने जेवणारे लोक चमचाचा वापर करतात. तर काही लोकांना कुठेही जेवण केलं, तरी ते संस्कृतीप्रमाणे हातानेच जेवण करण पसंत करतात..पण हाताने जेवणे आणि चमचाचा वापर करून जेवल्याने नेमकं काय घडतं? यामध्ये नेमका काय फरक आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
हाताने जेवायचं की चमच्याने?
हाताने जेवण करणं किंवा चमच्याने..दोघांचे वेगवेगळे फायदे आहेत.चमचा किंवा फॉकचा पावर नेहमीच साफसफाई आणि सुविधाजन्य खाण्यासाठी केला जातो. हाताने खाणं जास्त इंटरेक्टिव्ह असतं. भारतीय संस्कृतीत हाताने जेवण करणं चांगलं मानलं जातं. आयुर्वेदानुसार, या पद्धतीत खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते. हाताने जेवण केल्याने तोंड आणि हातांमध्ये संपर्क बनतो, जे पोट भरणं आणि जेवणाची चव वाढवतो.
नक्की वाचा >> डॉक्टर बनला जाएंट किलर! डॉ. पत्नीला टोचलं सर्वात खतरनाक इंजेक्शन..पोलीस तपासात उघड झालं सासऱ्याचं कनेक्शन!
हाताने जेवण करणं चांगलं?
हेल्थ एक्स्पर्टनुसार, हाताने जेवण करणं अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतं. यामुळे हळूहळू जेवण करण्यासा मदत होते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. हाताने जेवण केल्याने अन्नाचं तापमान जाणवणं सोपं होतं. तसच तोंडात योग्य प्रकारे चवीचा अनुभव येतो. अस्वच्छ हातांनी जेवण करणं आरोग्यासाठी हानिकारक असतं.
हाताने जेवण का करतात?
हाताने जेवण करण्यामागे फक्त परंपराच नाही, तर मनोविज्ञान आणि आरोग्याचं कारणंही त्यामागे आहे.आयुर्वेदानुसार, हातांच्या बोटांमध्ये अन्नाचं प्रमाण लक्षात घेता येतं. हाताने जेवणाचा घास घेतल्यावर एक वेगळचं समाधान वाटतं. तसच हाताने जेवताना जास्त अलर्ट राहावं, म्हणजेच जेवणाआधी हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. अनेक संस्कृतीमध्ये याला कुटुंब आणि सामुहिक भोजन दरम्यान प्रेम, सन्मान आणि सहकार्याचं प्रतिक मानलं जातं.
नक्की वाचा >> झुकेगा नही..उंच झाडावर बिबट्याने सिंहाला फोडला घाम, फांदी तुटताच गेम पलटला, Video पाहून लोटपोट हसाल
कोणत्या देशातील लोक हाताने जेवतात?
जगातील अनेक देशांमध्ये लोक आजही हाताने जेवण्याचा आनंद लुटतात. भारत, पाकिस्तान, नेपाळ, इंडोनेशिया, इथोपिया आणि आफ्रिकाच्या काही भागातील लोक हाताने जेवतात. त्यांच्याकडेही अशाप्रकारची परंपरा आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे, हाताने जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world