Benefits of Applying Ghee On Nabhi: धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण सोपे आणि नैसर्गिक उपाय करण्याच्या प्रयत्नात असतात. असाच एक जुना पण अतिशय प्रभावी उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तूप लावणे. आयुर्वेदानुसार या प्रक्रियेस "नाभी अभ्यंग" असे म्हणतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तूप लावल्यास आरोग्यास कोणकोणते फायदे मिळतील, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊया...
नाभीवर तेल का लावावे, तज्ज्ञांचे काय आहे म्हणणं?
अखंड योग इंस्टिट्युटचे संस्थापक डॉ. योगऋषि विश्वकेतु यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाभीवर तूप लावणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
पचनप्रक्रिया सुधारते
आयुर्वेदातील माहितीनुसार, नाभी आपल्या शरीरातील कित्येक ऊर्जा मार्गांचे (नाड्यांचे) केंद्र आहे. नाभीवर तूप लावल्यास पचन अग्नी संतुलित होण्यास मदत मिळू शकते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: नाभीमध्ये तेलाचे थेंब सोडण्याचे मोठे फायदे)
शरीराला आतील बाजूने मिळते पोषण
डॉ. योगऋषि यांनी सांगितले की, तुपामध्ये नैसर्गिकरित्या पोषणतत्त्व आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. त्यामुळे नाभीवर तूप लावल्यास शरीराला आतील बाजूने पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. विशेषतः त्वचा आणि ओठ मऊ होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Hing Benefits: नाभीवर हिंग लावल्यास काय होते?)
मज्जासंस्थेसाठी उत्तम उपाय
तुपातील ब्युट्रिक अॅसिड पचनप्रक्रिया आणि मज्जासंस्थेस आधार देते. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तूप लावून हलक्या हाताने मसाज केल्यास मेंदू शांत होण्यास मदत मिळेल. तणाव कमी होईल आणि चांगली झोप येईल. आयुर्वेदानुसार वात दोष संतुलित होऊन अस्वस्थता, चिंता कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Ghee Benefits : नाभीवर तूप लावण्याचे जबरदस्त फायदे)
नाभीवर कसे लावावे तूप?
- डॉ. योगऋषि यांनी सांगितले की, सर्वप्रथम तूप हलकेसे गरम करा.
- यानंतर नाभीवर दोन ते तीन थेंब लावून हलक्या हाताने मसाज करावा.
- नाभीवर तूप लावून मसाज केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासही लाभ मिळतील.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.