जाहिरात

Bra Full Form In Marathi: BRA शब्दाचा फुलफॉर्म माहितीय? 99% महिलाही अजाण, नाव ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Bra Full Form And Facts: ब्रा हे केवळ इनरवेअर नाहीय तर महिलांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पण 99 टक्के महिलांना ब्रा (BRA) या शब्दाचा फुलफॉर्मच माहिती नाहीय. तुम्हाला माहिती आहे का?

Bra Full Form In Marathi: BRA शब्दाचा फुलफॉर्म माहितीय? 99% महिलाही अजाण, नाव ऐकून व्हाल आश्चर्यचकित
"Bra Full Name : ब्रा या शब्दाचा अर्थ काय?"

Bra Full Form And Facts In Marathi : स्पर्धेच्या युगामध्ये फॅशन आणि स्टायलिश लुक प्रत्येकासाठीच अतिशय महत्त्वाचे आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलावर्गाच्या पोशाखांमध्ये वेगवेगळे आणि एकापेक्षा एक सुंदर पर्याय उपलब्ध असतात. महिलांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रा (Bra Full Form). बहुतांश लोक या विषयावर उघडपणे संवाद साधणे टाळतात. पण ब्रा केवळ कापडाचा एक तुकडा नाहीय तर  निरोगी आरोग्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ब्रासारखे इनरवेअर एखाद्या महिलेच्या शरीराला योग्य आकार, तिच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि दैनंदिन जीवनामध्ये आरामदायी पद्धतीने वावरण्यासाठी किती मोठा बदल आणू शकतो, याचा थोडासा विचार करा. ग्रामीण भागातील महिला आजही याबाबत अजाण आहेत.  BRA या शब्दाचा फुलफॉर्मसह त्याचे काही महत्त्वपूर्ण फॅक्टस देखील जाणून घेऊया...

ब्रा या शब्दाचा फुल फॉर्म (Full Form of Bra In Marathi)

ब्रा (Bra) या शब्दाची निर्मिती Brassiere या फ्रेंच शब्दातून झालीय. 1893 साली New York Evening Herald या आवृत्तीमध्ये या शब्दाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. 1907 साली Vogue Magazineमध्ये हा शब्द छापण्यात आला आणि हळूहळू या शब्दाचा वापर वाढू लागला. ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये Brassiere या शब्दाचा समावेश आहे. वेळेनुसार या शब्दाचा शॉर्ट फॉर्म BRA असा करण्यात आला. BRA या शब्दाचा फुल फॉर्म Breast Resting Area (ब्रेस्ट रेस्टिंग एरिया).

Latest and Breaking News on NDTV

कप साइज ब्रा लाँच (Introduction of Cup Sizes In Marathi)

सुरुवातीस ब्रा केवळ एकाच आकारामध्ये तयार केली जात असे. पण 1930च्या दशकात एस एच कँप कंपनीने A पासून ते D अक्षरापर्यंत कप साइज ब्रा लाँच केली. यानंतर महिला त्यांच्या फिटिंग आणि कम्फर्टनुसार इनरवेअरची निवड करू लागल्या. 

Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय? झोपण्यापूर्वी दूध किंवा पाण्यात मिक्स करा या गोष्टी, मग पाहा कमाल

(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय? झोपण्यापूर्वी दूध किंवा पाण्यात मिक्स करा या गोष्टी, मग पाहा कमाल)

चुकीच्या आकाराची ब्रा वापरण्याची समस्या (Problem of Wrong Size In Marathi)

रिपोर्टनुसार, जवळपास 80 टक्के महिला चुकीच्या आकाराची ब्रा वापरतात. चुकीच्या साइजच्या ब्रामुळे केवळ लुकच नव्हे तर फिटिंग देखील बिघडू शकते. शिवाय छातीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.  

ब्राची एक्सपायरी डेट (Expiry Date of Bra)

ब्राची देखील एक्सपायरी डेट असते का? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर हो असे आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार सहा ते नऊ महिने वापरल्यानंतर जुनी ब्रा फेकून द्यावी. दीर्घकाळ एकच ब्रा वापरल्यास त्याचे इलास्टिक खराब होते. काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आलंय की जुनी तसेच घट्ट ब्रा वापरल्यास ब्रेस्टवर त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

ब्रा धुण्याची योग्य पद्धत (Right Way To Wash Bra In Marathi)

ब्रा नियमित स्वच्छ धुवावी आणि मशिनचा वापर करण्याऐवजी हलक्या हाताने ब्रा धुवावी.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com