
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यापैकीच एक म्हणजे रात्रीची झोप. निरोगी राहण्यासाठी रात्री शांत आणि आरामदायक झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण अनेकदा महिला रात्री झोपताना ब्रा काढत नाहीत. ही एक छोटीशी चूक तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. रात्री ब्रा घालून झोपण्याचे दुष्परिणाम काय आहेत, याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करत सगळ्या महिलांना असे करणे चुकीचे ठरू शकते असे म्हटले आहे. निरोगी राहण्यासाठी रात्री शांत आणि आरामदायक झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण अनेकदा महिला रात्री झोपताना ब्रा काढत नाहीत. त्यामुळे त्यांना रात्री नीट झोप लागत नाही. ही एक छोटीशी चूक तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. तज्ज्ञांना याबाबत विचारले असता त्यांनी ब्रा शिवाय झोपणे महिलांसाठी का गरजेचे आहे हे सांगितले आहे.
'ब्रा'बद्दल प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?
रात्री झोपताना 'ब्रा' (Bra) काढून झोपणे ही एक सामान्य सवय असली तरी, अनेक महिलांना ती नसते. याविषयी अनेक प्रश्न मनात असतात. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, फोर्टिस हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ञ (Senior Gynecologist) डॉ. सोनाली गुप्ता यांनी माहिती दिली . डॉ. गुप्ता यांनी म्हटलंय की, 'माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या अनेक महिला प्रश्न विचारतात: 'डॉक्टर, जर आम्ही रात्री ब्रा घातली नाही, तर आरोग्यावर त्याचा परिणाम होईल का?' डॉ.गुप्ता यांनी त्यांच्या रुग्णांप्रमाणेच इतर महिलांनाही याबद्दलची माहिती व्हावी यासाठी रात्री ब्रा काढून झोपण्याचे 6 प्रमुख फायदे सांगितले आहेत.
रात्री झोपताना ब्रा काढून न झोपल्याने काय त्रास होऊ शकतो?
1. संसर्गाचा धोका: रात्री घट्ट ब्रा घातल्याने स्तनांच्या भागात घाम साचतो. यामुळे तिथे ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची भीती असते.
2. पुरळ आणि काळे डाग: रात्री घट्ट ब्रा घातल्याने त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि खाज येऊ शकते. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्वचेवर काळे डाग पडू शकतात.
3. ॲलर्जीच्या समस्या: सतत ब्रा घातल्यामुळे घामाच्या संपर्कात येऊन त्वचेवर फोड, मुरुम किंवा ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. यामुळे त्वचेला नुकसान होते.
4. रक्ताभिसरणावर परिणाम: रात्री घट्ट ब्रा घालून झोपल्यास रक्ताभिसरण योग्यप्रकारे होत नाही. यामुळे स्तनांमध्ये वेदना, सूज किंवा बधिरता जाणवू शकते.
5. शांत झोप न लागणे: घट्ट ब्रा घातल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि घाम येतो. यामुळे अस्वस्थता जाणवते आणि शांत झोप लागत नाही. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.
6. स्तनाच्या कर्करोगाचा धोका: काही संशोधनानुसार, रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. रात्री ब्रा काढल्याने स्तनांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रात्री ब्रा काढून झोपणे अधिक फायदेशीर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world