जाहिरात

Swollen Legs and Ankles Problems: पायांना सूज येतेय? शरीरामध्ये निर्माण झालीय या महत्त्वपूर्ण गोष्टीची कमतरता

Swollen Legs and Ankles Problems: एका महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पाय आणि टाचांना सूज येण्याची समस्या निर्माण होते, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Swollen Legs and Ankles Problems: पायांना सूज येतेय? शरीरामध्ये निर्माण झालीय या महत्त्वपूर्ण गोष्टीची कमतरता
"Swollen Legs and Ankles Problems: पायांना सूज का येते"

Swollen Legs and Ankles Problems: काही लोक प्रत्येक वेळेस पाय आणि टाचांना सूज येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. साधारणतः जास्त प्रमाणात मीठ खाणे, हृदय किंवा किडनीशी संबंधित समस्यांमुळे पायांना सूज येते. पण या व्यतिरिक्त एका महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही टाच आणि पाय सुजतात. याबाबत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवत असल्याचे कारण त्यांनी सांगितलंय. जाणून घेऊया डॉक्टर नेमके काय म्हणाले? 

पायांना सूज का येते?

डॉक्टर बर्ग यांच्या माहितीनुसार, शरीरातील व्हिटॅमिन B1च्या कमतरतेमुळे हात-पायांना सूज येऊ शकते. या महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनला थायमिन असेही म्हटले जाते. आपल्या शरीराच्या पेशींमध्ये एक सोडिअम पोटॅशिअम पंप असते, जे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. जेव्हा हे पंप योग्य पद्धतीने काम करत नाही, तेव्हा पाणी पेशींबाहेर जमा होऊ लागते. यामुळे पायांवर सूज येऊ लागते. याव्यतिरिक्त रक्तशर्करेची पातळी वाढल्यासही पायांमध्ये सूज येऊ लागते. 

Collagen Deficiency Issue: कोलेजनच्या कमतरतेमुळे बिघडतेय तुमचे सौंदर्य, खा या गोष्टी 15 दिवसांत दिसाल तरुण

(नक्की वाचा: Collagen Deficiency Issue: कोलेजनच्या कमतरतेमुळे बिघडतेय तुमचे सौंदर्य, खा या गोष्टी 15 दिवसांत दिसाल तरुण)

व्हिटॅमिन B1चे महत्त्व

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन B1 शरीरातील अतिरिक्त शर्करेस ऊर्जेमध्ये बदलण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी1च्या कमतरतेमुळे साखरेचे योग्यरित्या विघटन होत नाही, ज्यामुळे शरीराच्या अवयवांवर सूज वाढते आणि अशक्तपणा जाणवतो. दुसरीकडे व्हिटॅमिन बी1ची कमतरता निर्माण झाली तर शरीराच्या नसांचेही नुकसान होते. पायांमध्ये उष्णता जाणवणे, मुंग्या येणे आणि पाय सून्न होणे यासारख्या समस्या देखील उद्भवतील. 

Health News: सतत झोप येते का? कितीही झोपलं तरीही झोप पूर्ण होत नाही का? शरीरात या व्हिटॅमिनची आहे कमतरता

(नक्की वाचा: Health News: सतत झोप येते का? कितीही झोपलं तरीही झोप पूर्ण होत नाही का? शरीरात या व्हिटॅमिनची आहे कमतरता)
 

व्हिटॅमिन बी1ची  पातळी कशी वाढवावी?

  • डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डाएटमध्ये अख्खे धान्य, डाळी, सुकामेवा आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. 

  • जास्त साखर, मैदायुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे.  
  • पायांना जास्त सूज येत असेल तर डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा.  
  • केवळ थकवा आल्यामुळे नव्हे तर व्हिटॅमिन बी1ची कमतरता आणि साखरेचे अतिरिक्त सेवन यामुळेही पाय सुजतात. 
  • गंभीर समस्या उद्भवण्याआधीच आवश्यक तपासण्या करुन घ्या.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com