Salt Side Effect: ताटातील जेवणात चिमुटभर मीठ टाकताय? आताच 'ही' सवय मोडा, आरोग्यावर होतात सर्वात घातक परिणाम

एका जागतिक अहवालानुसार, दरवर्षी जगभरात सुमारे 18 लाख लोक केवळ मिठाच्या अतिसेवनामुळे उद्भवणाऱ्या आजारांनी आपला जीव गमावतात. शरीरासाठी मीठ आवश्यक असले तरी, त्याचे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Salt Side Effect: जेवणाला मिठाशिवाय चव नाही हे खरे असले, तरी तेच मीठ तुमच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. अनेक लोकांना शिजवलेल्या जेवणात वरून मीठ टाकण्याची सवय असते. काकडी-टोमॅटोच्या सलाडवर, ताकामध्ये किंवा फळांवर वरून मीठ भुरभुरवून खाणे चवीला जरी चांगले वाटत असले, तरी ते आरोग्यासाठी सायलेंट किलर ठरत आहे.

एका जागतिक अहवालानुसार, दरवर्षी जगभरात सुमारे 18 लाख लोक केवळ मिठाच्या अतिसेवनामुळे उद्भवणाऱ्या आजारांनी आपला जीव गमावतात. शरीरासाठी मीठ आवश्यक असले तरी, त्याचे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे.

मिठाचे शरीरावर होणारे घातक परिणाम

मीठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जेव्हा शरीरात सोडियम वाढते, तेव्हा ते पाणी साठवून ठेवते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. याचे काही प्रमुख दुष्परिणाम आहेत.

उच्च रक्तदाब

जास्त सोडियममुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत पाणी साचते. यामुळे रक्तदाब वाढतो. हाय ब्लड प्रेशरमुळे केवळ हृदयावरच नाही, तर संपूर्ण रक्तवाहिन्यांवर ताण येतो. सातत्याने मीठ जास्त खाल्ल्याने रक्तवाहिन्या कडक होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन म्हणतात.

Advertisement

(नक्की वाचा-  Man Loses Vision Mid-Workout: बापरे! वर्कआऊट करता करता डोळा गेला... जीममध्ये 'ही' चूक करु नका)

हार्ट अटॅकचा धोका

जेव्हा रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो, तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

किडनीचे नुकसान

रक्तातील अतिरिक्त सोडियम आणि पाणी फिल्टर करण्याचे काम किडनी करते. मात्र, मिठाचे सेवन वाढल्यास किडनीवर कामाचा ताण वाढतो. यामुळे भविष्यात किडनी स्टोन किंवा किडनी निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Advertisement

पोटाच्या कॅन्सरचा धोका

मिठाचे अतिसेवन पोटाच्या आतील नाजूक आवरणावर परिणाम करते. संशोधनानुसार, जास्त मीठ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये पोटाचा अल्सर आणि गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.

वजन वाढणे आणि सूज

शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने 'वॉटर रिटेंशन' होते. यामुळे अचानक वजन वाढल्यासारखे वाटते. तसेच हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.

(नक्की वाचा-  चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार)

पचनाच्या समस्या आणि त्वचा रोग

जास्त मीठ खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अतिसार आणि पचनक्रियेत अडथळे येतात. इतकेच नाही तर, रक्तातील अशुद्धी वाढल्यामुळे खाज येणे किंवा इतर त्वचाविकारांचा धोकाही बळावतो.

Advertisement

आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, पापड, लोणचे आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये आधीच मिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जेवणात वरून मीठ टाकणे आजच बंद करा. चवीसाठी आरोग्याचा बळी देऊ नका. तुमचे आरोग्य आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे तुमच्या हातात आहे.

Topics mentioned in this article