
Blue Light Affect : डिजिटल जगात स्मार्टफोन , लॅपटॉपपासून ते टीव्ही आणि गेमिंग सिस्टमपर्यंत आपण वापरत असलेल्या जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसमध्ये स्क्रीन आहे. या उपकरणांचा वापर करण्यासाठी आपण घालवलेल्या वेळेला 'स्क्रीन टाइम' म्हणतात. बहुतेक LED टीव्ही, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर LED लाइट्समधून 'ब्लू लाईट' बाहेर पडतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आजच्या आधुनिक जगात स्क्रीनचा वापर टाळता येत नाही, पण ब्लू लाईटचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाइटनुसार, झोपण्यापूर्वी स्मार्टफोन किंवा ब्लू लाईट बाहेर टाकणारी इतर उपकरणे वापरल्यास मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. मेलाटोनिन हार्मोन झोपेवर नियंत्रण ठेवतात. परिणामी, लवकर झोप लागत नाही आणि गाढ झोपही कमी होते. गाढ झोप ही नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया वापरल्यास तुम्ही कमी तास झोपता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ताजेतवाने वाटत नाही.
(नक्की वाचा- खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड)
लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम
बोस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मायकेल रिच यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका लेखात सांगितले की, लहान मुलांचे मेंदू सतत विकसित होत असतात. जास्त डिजिटल मीडियाच्या वापरामुळे या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. स्क्रीनवरील उत्तेजना ही प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ, वाचन आणि इतर सर्जनशील गोष्टींसारख्या ऑनलाइन आणि ऑफलाइन गोष्टी आवश्यक आहेत.
गेम्स आणि सोशल मीडियाचे व्यसन का लागते?
डॉ. रिच यांनी पुढे सांगितले की, ऑनलाइन गेम्स आणि सोशल मीडियामध्ये 'व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीम'चा वापर केला जातो, जे स्लॉट मशीनसारखे काम करतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा फोटो पोस्ट केल्यास एका दिवशी तुम्हाला खूप लाईक्स मिळतील आणि दुसऱ्या दिवशी कमी. उत्साह आणि निराशा यांच्या मिश्रणामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा चेक करत राहता, ज्यामुळे याचे व्यसन लागते.
(नक्की वाचा- Parenting Tips: शाळेतून आल्यावर मुलांना हे 5 प्रश्न नक्की विचारा? तज्ज्ञांनी कारणही सांगितलं)
स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी काही सोपे उपाय
स्क्रीन टाईनसाठी एक ठराविक लिमिट सेट करा. तुमच्या फोनवर सतत नोटिफिकेशन येत असतील तर ते बंद करा. नोटिफिकेशन बंद केल्यास तुम्ही फक्त तुम्हाला हवे तेव्हाच ॲप्स उघडाल. जेवताना किंवा कुटुंबासोबत बोलताना फोनचा वापर टाळा.
सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी इतर चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडिया ॲप्स मोबाईलमधून डिलीट करा, त्यावरच अनेकांचा सर्वाधिक वेळ जातो. फक्त लॅपटॉपवरून आवश्यक असेल तेव्हाच ते वापरा. झोपताना फोन दूर ठेवा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world