
"Fruits Benefits: रोज ही दोन फळं खाण्याचे फायदे"
- डॉ. कुशल बांगर, इंटेन्सिव्हिस्ट आणि जनरल फिजिशियन, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली
नियमित सफरचंद खाल्ले तर डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही, असे म्हणतात. पण तज्ज्ञांच्या मते सफरचंदाव्यतिरिक्त अशी दोन फळं आहेत, ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळतील. आरोग्यवर्धक फळं म्हणजे डाळिंब आणि केळ.
डाळिंब | Health Benefits Of Pomegranate
- डाळिंब हे फळ सुपरफ्रूट म्हणूनही ओळखले जाते.
- डाळिंबातील अँटी-ऑक्सिडंट्स हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात.
- तसेच रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठीही डाळिंब खाणे अतिशय उपयुक्त ठरू शकते.
- डाळिंबातील पोषणतत्त्वांमुळे रक्तशुद्ध होते, यामुळे शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत मिळते.
- डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा असतो, ज्यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
- डाळिंबामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत मिळते.
- सलग एक आठवडा डाळिंब खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.
(नक्की वाचा: Banana Benefits: रोज एक केळ खाण्याचे फायदे)
डाळिंब खाण्याचे फायदे
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
- शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
- अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने कॅन्सरसारख्या आजारापासून शरीराचे संरक्षण होते.
(नक्की वाचा: Best Time To Eat Fruits: फळं खाण्याची सर्वात चांगली वेळ कोणती? न्युट्रिशनिस्टने सांगितली महत्त्वाची माहिती)
केळ | Health Benefits Of Banana
- केळ हे अतिशय स्वस्त आणि सहजरित्या उपलब्ध असणारे फळ आहे. केळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
- केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक आहे, जे हृदय आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- पचनसंस्था सुधारण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी केळी खाणे फायदेशीर मानले जाते.
- रोज एक केळ खाणे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. कारण यामध्ये फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजांचा मोठा साठा आहे.
- यातील पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुधारते, शरीराची ऊर्जा वाढते, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
- तणाव कमी होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world