जाहिरात

Skin Care Tips: सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत कोणती? किती लावावे? डर्मेटॉलॉजिस्टने सांगितला '2 Finger Rule'

How To Apply Sunscreen: सनस्क्रीन कसे आणि किती प्रमाणात लावायचे? याबाबत एशियन हॉस्पिटलच्या डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. राधिका रहेजा यांनी सांगितलेला टू-फिंगर रुल आणि सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत.

Skin Care Tips: सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत कोणती? किती लावावे? डर्मेटॉलॉजिस्टने सांगितला '2 Finger Rule'
"How To Apply Sunscreen: सनस्क्रीन कसे वापरावे?"
Gemini AI

How To Apply Sunscreen: टॅनिंग, सनबर्न, सुरकुत्या आणि वांग यासारख्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहायचे असेल तर सनस्क्रीन लावणे अतिशय गरजेचे आहे, असा सल्ला तुम्ही अनेकांकडून ऐकला असेलच. उन्हाळा असो किंवा हिवाळा, सनस्क्रीन लावणे निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे. पण अनेकांना सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत माहिती नसते. काही लोक घरातून बाहेर पडण्यापूर्वी लगेचच ते चेहऱ्यावर लावतात, तर काही जण खूपच कमी प्रमाणात चेहऱ्यावर क्रीम अप्लाय करतात. सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत कोणती? सनस्क्रीन कसे वापरावे? अशा या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सुद्धा गुगलवर शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

'एनडीटीव्ही'ने (NDTV) एशियन हॉस्पिटल फरिदाबादच्या 'कन्सल्टंट डर्मेटोलॉजी अँड हेअर ट्रान्सप्लांट' डॉ. राधिका रहेजा यांच्याशी बातचीत केली. तुमच्या या प्रश्नांचे उत्तर देताना डॉक्टरांनी फक्त एक 'ट्रिक' सांगितली. डॉ. राधिका यांचे म्हणणे आहे की, कोणतीही वेळ असो, तुम्हाला फक्त सनस्क्रीन लावण्याची एक सोपी ट्रिक माहित असायला हवी.

Latest and Breaking News on NDTV

चेहऱ्यावर सनस्क्रीन कसे वापरावे? | How To Use Sunscreen On Face

डॉ. राधिका यांनी सांगितले की, चेहऱ्यावर सनस्क्रीन कसे लावावे? चेहऱ्यावर किती सनस्क्रीन लावले पाहिजे? हे सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहेत, पण याचे उत्तर खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त "दोन बोटांचा नियम" (Two-Finger Rule) फॉलो करायचा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला तुमच्या तर्जनी आणि मधल्या बोटावर सनस्क्रीनची एक-एक रेष काढायची आहे आणि तितक्याच प्रमाणात क्रीम संपूर्ण चेहऱ्यावर लावायची आहे.

(नक्की वाचा: Hand Numbness Causes: तुमच्याही हात-पायांना मुंग्या येतात का? कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे निर्माण होते ही समस्या)

मानेवर सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत | How To Apply Sunscreen On Neck 

डॉ. राधिका यांनी पुढे सांगितले की, जर तुम्हाला चेहऱ्यासोबतच मानेवरही सनस्क्रीन लावायचे असेल तर तुम्हाला "तीन बोटांचा नियम" (Three-Finger Rule) फॉलो करावा लागेल. आता तुम्हाला दोन बोटांऐवजी तुमच्या तीन बोटांवर सनस्क्रीन घ्यायचे आहे आणि चेहऱ्यासोबतच मानेवरही लावायचे आहे.

(नक्की वाचा: Dark Circles Home Remedy: डोळ्यांखालील डार्क सर्कल काही दिवसांत गायब, घरच्या घरी तयार करा नॅचरल आय क्रीम)

दिवसातून किती वेळा सनस्क्रीन लावले पाहिजे? | How Many Times To Apply Sunscreen In A Day

डॉ. राधिका यांच्या मते, दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन (Re-apply) पुन्हा लावले पाहिजे. जर तुम्ही उन्हात असाल तर चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून सनस्क्रीन लावा. घाम आल्यावर आणि चेहरा धुतल्यानंतरही ते चेहऱ्यावर पुन्हा लावले पाहिजे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com