मास्क आधारकार्ड डाऊनलोड करा, फसवणुकीचा धोका टाळा!

प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड वापरत असाल तर, आताच मास्क आधार कार्ड डाऊनलोड करा आणि आधार कार्ड वापरताना होणाऱ्या फसवणुकीपासून सुटका मिळवा.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आधार कार्ड हे महत्त्वाच्या दस्ताऐवजांपैकी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे. जन्मानंतर, मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. शाळेतील कामांपासून ते विवाह प्रमाणपत्रापर्यंत सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. इतकेच नव्हे तर रेल्वेस्थानकावर तिकीटासाठी त्याचबरोबर सिम कार्ड विकत घेताना आधारकार्ड मागितले जाते. अशा अनेक गोष्टींसाठी प्रत्येकवेळी आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आपल्या दैनंदिन आयुष्यात सातत्याने आधार कार्डचा वापर करत असताना, अनोळखी ठिकाणी, अनोळखी व्यक्तीकडे थेट आधार कार्ड देणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं. आधार कार्डमध्ये वैयक्तिक माहिती असते. ते अनेक कागदपत्रांसोबत लिंक असतं. बँक खात्याशी लिंक असते. त्यामुळे आधार कार्डवरील माहितीद्वारे कुणीही बँकेसंदर्भातील गोपनीय माहिती सहज मिळवू शकतो. इतकंच नव्हे, तर कुणीही आपल्या आधार कार्डचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थित आधार कार्ड किंवा आधारकार्डचा झेरॉक्स न वापरता, मास्क आधार कार्डचा वापर करा. 

(नक्की वाचा: काय आहे 2.0 पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?)

काय आहे मास्क आधार कार्ड?

मास्क आधार कार्ड हे आपण वापरत असलेल्या, रेग्युलर आधार कार्डपेक्षा वेगळे असते. म्हणजेच, नियमित आधार कार्डावर आधार कार्डधारकाचा आधार नंबर 12 अंकांमध्ये असतो. मात्र, मास्क आधार कार्डवर आधार कार्डधारकाची गोपनीयता लक्षात घेता, सुरुवातीचे 8 अंक xxxx-xxxx अशाप्रकारे हाइड केलेला असतात. तर, फक्त उर्वरित 4 अंक दाखवले जातात. 

Advertisement

मास्क आधार कार्ड सुरक्षित आहे. या आधार कार्डामध्ये नियमित आधार कार्डाप्रमाणेच आधार कार्डधारकाचे नाव, पत्ता, लिंग, डीओबी आणि क्यूआर कोड समाविष्ट आहे. मास्क आधार कार्डावर UIDAI ची स्वाक्षरी असते. त्यामुळे हे आधार कार्ड स्वीकारण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.  

(नक्की वाचा: भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!)

मास्क आधार कार्ड डाउनलोड कसा करावा?

Uidai च्या https://uidai.gov.in/ या वेबसाईटवरून मास्क आधार कार्ड डाऊनलोड करा.  

वेबसाईट ओपन केल्यावर ‘My Aadhar' या टॅबवर क्लिक करा.

विचारली गेलेली माहिती भरा. त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर आधारसह लिंक असलेल्या मोबाइलवर नंबरवर ओटीपी येईल.

ओटीपी टाकून पुढील पडताळणी (Verification) करावी लागेल.

व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ‘Download' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर मास्क आधार पाहिजे का? असा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा. आणि मास्क आधार कार्ड डाउनलेड होईल. जे कायम तुमच्या फोनमध्येच सेव्ह राहील. 

Advertisement

अशाप्रकारे मास्क आधार कार्ड डाऊनलोड करता येतं. जे मास्क आधार कार्ड अनेक ठिकाणी वापरता येतं.