Poisonous Liquor: वीकेंडला मित्रांसोबत पार्टी करणे किंवा स्वस्त डील पाहून दारू खरेदी करणे ही अनेक लोकांची सवय असते. पण जर तुमच्या ड्रिंकमध्ये 'मिथेनॉल' सारखे विषारी केमिकल मिसळले असेल तर हाच एक पेग जीवघेणा ठरू शकतो. सर्वात धोकादायक बाब म्हणजे सुरुवातीला याचा परिणाम सामान्य दारूसारखाच वाटतो, त्यामुळे आपण दारू नाही तर विष प्यायलो आहोत हे बहुतांश लोकांना समजतच नाही. भेसळयुक्त दारू इतकी धोकादायक का असते आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा? याबाबत माहिती जाणून घेऊया.
शेड्युलनुसार दारूमध्ये भेसळ का केली जाते?
अधिक नफा कमावणे: ब्रँडेड दारूवर जास्त कर (टॅक्स) असल्यामुळे तिची किंमतही अधिक असते. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही लोक जास्त नफा कमावण्यासाठी बनावट दारूमध्ये मिथेनॉल मिसळतात. अनेकदा बेकायदेशीरपणे दारू बनवताना चुकीची प्रक्रिया अवलंबल्यानेही मिथेनॉल तयार होते. हे इंडस्ट्रियल केमिकल स्वस्त असल्याने याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो.

शरीराला आतून कशा प्रकारे नुकसान पोहोचवते?
रक्तातील आम्लता वाढणे: मिथेनॉल शरीरात पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर आधी 'फॉर्मेल्डिहाइड' आणि नंतर 'फॉर्मिक ॲसिड'मध्ये होते. यामुळे रक्तातील आम्लतेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'मेटाबॉलिक ॲसिडोसिस' (Metabolic Acidosis) म्हटले जाते.
गंभीर लक्षणे: सुरुवातीला व्यक्तीला सामान्य दारूसारखीच नशा जाणवते, पण 12 ते 24 तासांनंतर तीव्र पोटदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंधुक दिसणे, अंधत्व येणे, झटके येणे आणि कोमा यासारखी गंभीर लक्षणे समोर येऊ शकतात.
(नक्की वाचा: Lungs Recovery: सिगारेट सोडल्यानंतर फुफ्फुसे कधी नॉर्मल होतात? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलेले सत्य ऐकून पायाखालची जमीन सरकेल)
चुकून भेसळयुक्त दारू प्यायल्यास काय करावे?
जर एखाद्या व्यक्तीने भेसळयुक्त दारू प्यायली असेल किंवा तसा संशय असेल तर कोणताही विलंब न करता त्याला तत्काळ अशा रुग्णालयात घेऊन जा जेथे डायलिसिसची (Dialysis) सुविधा उपलब्ध असेल.
नेहमी परवानाधारक (लायसन्स असलेल्या) आणि चांगल्या दुकानांमधूनच दारू खरेदी करा. सीलबंद बिअर, वाइन किंवा ड्युटी फ्री मधून खरेदी केलेल्या दारूमध्ये भेसळ होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. घरगुती दारू, स्थानिक कॉकटेल किंवा बाजारभावापेक्षा अतिशय स्वस्त मिळणाऱ्या ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world