जाहिरात

Pimpri Chinchwad:'दारू पेक्षा ऊसाचा रस पिऊ' विषारी दारू कांडातून बचावलेले अजून काय-काय बोलले

तिसऱ्या रुग्णाची प्रतिक्रीया तर बोलकी होती. त्याने दारूचा धसका घेतला आहे.

Pimpri Chinchwad:'दारू पेक्षा ऊसाचा रस पिऊ' विषारी दारू कांडातून बचावलेले अजून काय-काय बोलले
  • पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिण्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता
  • या विषारी दारू कांडानंतर १२ दिवसांत ३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनी दारू न पिण्याचं ठरवलं आहे
  • रुग्णालयातील उपचारांनी या रुग्णांचे जीव वाचवले असून डॉक्टरांच्या सततच्या काळजीमुळे त्यांना जीवदान मिळाले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

विषारी दारू कांडाने अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये ही घटना घडली होती. यात अनेकांची स्थिती गंभीर झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते मृत्यूशी झुंज देत होते. या विषारी दारू कांडाला 12 दिवस होवून गेले. त्यातील 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पूर्ण पणे बरे होवून ते रुग्णालयातून बाहेर पडले. या तिघांनी ही यापुढे काही झालं तर दारू पिणार नाही अशी शपथ घेतली आहे. शिवाय जे दारू पित असतील त्यांच्यासोबत बोलणार ही नाही असा निर्धार ही त्यांनी केला आहे. आम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो आहे. त्यामुळे पुन्हा त्या मार्गावर जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. 

त्यातील पहिली व्यक्ती सांगते, ही विषारी दारू पिऊन माझे दोन तरणी सोन्यासारखी पोरं मेली. पोरं मेली आपण जगून काय करणार. त्यातून नैराश्य आले. त्यामुळे मी ही तिच विषारी दारू प्यायली. त्यानंतर थेट रुग्णालयात पोहोचलो. पण डॉक्टरांनी मरणाच्या दारातून परत आणलं. आता जगण्याची इच्छा नाही. पण कुटुंबासाठी जगावं लागेल असं त्यांनी सांगितलं. पण या पुढे कधीच दारू पिणार नाही. जो कोणी पित असेल त्यालाही पिऊ नको म्हणून सांगेन. जर ऐकलं नाही तर त्याला हाणेन असं ही त्यांनी सांगितलं.  

नक्की वाचा - Pune News: मंदीर, मस्जिद जमिनदोस्त, आता बुद्ध विहार अन् चर्च ही रडारवर, अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई

दुसऱ्या रुग्णाची ही भावना काही वेगळी नव्हती. डॉक्टर पाच पाच मिनिटाला आमची काळजी घेत होते असं त्याने सांगितलं. त्यामुळेच आम्ही वाचलो. त्या दिवशी  तीस रुपयांची दारु प्यायलो. पण ती जिवावर बेतली. जसे पैसे द्यायचो कसे दारु पित होतो. कुणाला माहित होतं असं होणार आहे. पण आमच्या सोबत वाईट झालं. यापुढे कधी पिणार नाही. त्या दिवशी दारु प्यायल्यानंतर दम लागत होता. समोरचं काही दिसत नव्हतं. उलट्या होत होत्या. त्यानंतर डायरेक्ट रुग्णालयात आलो. आपण मजूरीचं काम करतो. त्यामुळे प्यावी लागत होती. आता पिणार नाही. व्यवस्थित राहणार. दारु पिणाऱ्यांसोबत बोलणार ही नाही. मरता मरता वाचलो आहे. दारूने भयंकर त्रास होतो हे आता समजलं आहे असं ही ते म्हणाले.

नक्की वाचा - Pune News: गरीबांच्याच नशिबी हे का? अंत्ययात्रेसाठी शेकडो गावकऱ्यांचा जीव धोक्यात, प्रशासनही बेपर्वा?

तिसऱ्या रुग्णाची प्रतिक्रीया तर बोलकी होती. त्याने दारूचा धसका घेतला आहे. या पुढे आपलं काम आणि घर येवढचं पाहाणार. कामानंतर घरी येणार जेवणार आणि झोपणार. पण या पुढे कधीच दारू पिणार नाही असा पण त्याने केला आहे. दारूची तलब आलीच तर  ऊसाचा रस पिऊन वेळ मारेन. पण दारूला हात लावणार नाही. ऊसाचा रस पोटासाठी चांगला. दारू म्हणजे विष आहे. त्यामुळे ते कोणी ही घेवू नये असं ही त्यांनी सांगितलं. दरम्यान त्या दिवशी काय झालं ते ही त्यांनी सांगितलं. सकाळी उठलो. त्यावेळी काहीच दिसत नव्हतं. मित्रांना सांगितले. डोळे बंद झाले. त्यांना आधी चेष्ठा वाटली. पण नंतर  मित्रांनी दवाखान्यात आणलं. इथं उपचार झाले आणि आता वाचलो असं ही ते म्हणाले. दरम्यान डॉ.राजेश वाबळे,डॉ.अभय दादेवार आणि डॉ. सोनी यांच्या प्रयत्नाने या सर्वांचे जिव वाचले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com