जाहिरात

Alcohol Overdose Levels: फुलटाइट होण्यासाठी दारू पिणं विषसमान, मृत्यूही होऊ शकतो; या 4 लोकांना सर्वाधिक धोका

Alcohol Overdose: जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास आरोग्यास कोणते परिणाम होऊ शकतात आणि कोणत्या लोकांना सर्वात जास्त धोका निर्माण होऊ शकतो.

Alcohol Overdose Levels: फुलटाइट होण्यासाठी दारू पिणं विषसमान, मृत्यूही होऊ शकतो; या 4 लोकांना सर्वाधिक धोका
"Alcohol Overdose Levels: जास्त प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी ठरेल घातक, कसं?"
Canva

Dangers of Alcohol Overdose: मर्यादित स्वरुपात मद्यपान करणं सामान्य बाब असू शकते. पण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दारू पिणे शरीरासाठी विषसमान ठरेल. जास्त प्रमाणात दारू पिणे किंवा दारूमुळे शरीरात होणारे पॉयझनिंग ही आरोग्यासाठी एक गंभीर स्थिती ठरू शकते, यामुळे जीवघेण्या परिणामांना सामोरे जावं लागू शकतं. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात? कोणत्या लोकांना सर्वाधिक धोका पोहोचू शकतो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

दारूचा ओव्हरडोस म्हणजे काय? | What Is An Alcohol Overdose? In Marathi

जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात मद्यपान करते, तेव्हा संबंधित व्यक्तीचे शरीर दारूचे चयापचय लवकर करू शकत नाही. यामुळे रक्तामध्ये दारूचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदू आणि शरीराच्या कार्यप्रणालीवर खोलवर परिणाम होतो. दारू पिणाऱ्याचे मेंदूवर नियंत्रण राहत नाही आणि श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या, हृदयाच्या गतीमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात. इतकंच नव्हे तर जास्त प्रमाणात दारू पिणारा व्यक्ती शुद्धीतही नसतो. यासह उलट्या होणे, त्वचा चिकट होणे, चालणंही कठीण होणे तसेच जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास मेंदूंचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो.  

धोकादायक संकेत

  • उलटी होणे 
  • बेशुद्ध होणे किंवा जास्त प्रमाणात झोप येणे 
  • श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे येणे 
  • हृदयाची गती वाढणे किंवा कमी होणे  
  • शरीराचे तापमान कमी होणे 
  • त्वचा निळी किंवा पिवळ्या रंगाची होणे 

यापैकी कोणतेही लक्षणं शरीरामध्ये आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, अन्यथा जीवावर बेतू शकते. 

जास्त प्रमाणात दारू पिणे घातक ठरू शकते 

श्वासोच्छवासाची समस्या : जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास शरीराच्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतात, यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. 
कोमामध्ये जाण्याची भीती : अति मद्यपानामुळे मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतात, एखादी व्यक्ती कोमामध्येही जाऊ शकते.
हृदयाची गती थांबू शकते : दारू जास्त प्रमाणात प्यायल्यास हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, ज्यामुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढू शकतो. 
मृत्यूचा धोका: जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास आणि त्यावर योग्य वेळेत उपाय न केल्यास अचानक मृत्यू होण्याचाही धोका उद्भवू शकतो. 

सावधान! या औषधांसह दारू पिताय?

  • दारू प्यायल्यानंतर झोप किंवा चिंताविकाराशी संबंधित औषधांचे सेवन करणं धोकादायक ठरू शकते.  
  • पेनकिलर्ससोबत दारू पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. 
  • दारूप्रमाणेच या औषधांमुळेही मेंदूच्या काही भागांवर दाब येतो, त्यामुळे श्वासोच्छवास यासारख्या महत्त्वाच्या कार्यप्रणालींमध्ये अडथळे निर्माण होतात. 

(नक्की वाचा: Winter Health News: हिवाळ्यात दारू पिऊ शकतो? एका दिवसात किती दारू प्यावी, 99% लोकांना माहितीच नाहीय अचूक उत्तर)

जास्त प्रमाणात दारू पिणे कोणासाठी ठरेल धोकादायक? Blood Alcohol Concentration (BAC) Levels 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अ‍ब्युज अँड अल्कोहोलिझमने, जास्त प्रमाणात मद्यपान म्हणजे दारू पिण्याची एक पद्धत म्हणून परिभाषित केले जाते, म्हणजे रक्तामध्ये अल्कोहोल कॉन्स्ट्रेशन (BAC) 0.08 टक्के किंवा प्रति डेसिलीटर 0.08 ग्रॅम दारू किंवा त्याहून अधिक प्रमाणात आढळल्यास या स्थितीस 'दारूचा ओव्हरडोस' असे म्हणतात. या पॅटर्नप्रमाणे एका सामान्य प्रौढ व्यक्तीच्या सवयीनुसार जवळपास दोन तासांत पाच किंवा त्याहून अधिक ड्रिंक (पुरुष) किंवा चार किंवा त्याहून जास्त ड्रिंक (महिला) पिण्याच्या सवयींशी हे प्रमाण जुळते.  

किशोरवयीन आणि तरुणांसाठी अति प्रमाणात दारू पिणे धोकादायक ठरू शकते. कारण किशोरवयीन आणि महाविद्यालयीन तरुण बहुतांश वेळेस जास्त प्रमाणात मद्यपान करतात, ज्यामुळे त्यांच्या मेंदू आणि शरीराच्या अन्य कार्यप्रणालींवर दुष्परिणाम होतात,अशी माहिती संशोधनाद्वारे समोर आलीय. 

1. लहान वयातील मंडळी: तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त प्रमाणात मद्यपान करण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते.
2. वारंवार दारू पिणारे: जे लोक नियमित स्वरुपात दारू पितात, त्यांना जास्त धोका असतो.
3. वैद्यकीय समस्या: हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांसाठी जास्त प्रमाणात मद्यपान करणे घातक ठरू शकते.
4. रिकाम्या पोटी दारू पिणारे: रिकाम्या पोटी दारू पिणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर जलदगतीनं दुष्परिणाम होतात. 

रक्तामध्ये दारूचे प्रमाण वाढल्यास काय होते?

रक्तामध्ये दारूचे जास्त प्रमाण आढळल्यास एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू शकते आणि त्यांची विचार करण्याची क्षमता बिघडू शकते. इतकंच नव्हे तर दारूच्या नशेत पडणे किंवा अपघात, हिंसाचार आणि अनपेक्षित लैंगिक कृत्यांमुळे दुखापत होण्याचाही धोका वाढवू शकतो. जेव्हा BAC (Blood Alcohol Concentration) उच्च पातळीपर्यंत पोहोचते तेव्हा एखादी व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com