जाहिरात

Lungs Health : तुमचं फुप्फुसं 100 % निरोगी आहे हे कसं ओळखाल? डॉक्टरांनी सांगितली सोपी ट्रिक 

Lung Health Test At Home:तसं पाहता फुप्फुसं हेल्दी आणि मजबूत ठेवण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र अनेकांना हा प्रश्न पडत असेल की आपलं फुप्फुसं हेल्दी आहे की नाही हे कसं ओळखायचं?

Lungs Health : तुमचं फुप्फुसं 100 % निरोगी आहे हे कसं ओळखाल? डॉक्टरांनी सांगितली सोपी ट्रिक 
Lung Health Test At Home: घरात फुप्फुसांच्या क्षमतेची टेस्ट कशी करता येईल?

Lungs Health: फुप्फुसं आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. श्वासोच्छवास फिल्टर करण्याबरोबरच फुप्फुसं अधिक उपयोगी आहेत. सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये दूषित वातावरण, धूळ-माती, प्रदूषणामुळे सर्वाधिक परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. नवनव्या व्हायरसमुळे फुप्फुसाच्या क्षमतेवर परिणाम होतो. बरेच जण फुप्फुसं निरोगी राहण्यासाठी उपाययोजना करतात.

तसं पाहता फुप्फुसं निरोगी आणि मजबूत ठेवण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र अनेकांना हा प्रश्न पडत असेल की आपलं फुप्फुसं निरोगी आहे की नाही हे कसं ओळखायचं? फुप्फुसं आणि क्षमता ओळखण्यासाठी कोणती टेस्ट करायला हवी. डॉक्टर अरविंद कुमार यांनी एक अशी ट्रिक सांगितली जी आपण घरात फॉलो करू शकता आणि फुप्फुसाची क्षमता तपासू शकता.   (How to find lungs are healthy)

Cardamom And Clove Benefits: रोज वेलची-लवंग एकत्र खाल्ल्यास काय होईल? या 4 लोकांच्या आयुष्यात होईल मोठा बदल

नक्की वाचा - Cardamom And Clove Benefits: रोज वेलची-लवंग एकत्र खाल्ल्यास काय होईल? या 4 लोकांच्या आयुष्यात होईल मोठा बदल

निरोगी फुप्फुसं ओळखण्याची सोपी ट्रिक l (Easy Way to Identify Healthy Hungs)

डॉ. अरविंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुफ्पुसाची क्षमता तुम्ही सोप्या पद्धतीने श्वास रोखून ठेवण्याच्या चाचणीने करू शकता. 

तुमची फुप्फुसं निरोगी आहेत हे तुम्हाला ओळखायचं असेल तर एक दीर्घ श्वास घ्या आणि ४५ सेकंद श्वास रोखून धरा. जर तुम्ही श्वास इतका वेळ होल्ड करू शकला तर तुमची फुप्फुसं एकदम हेल्गी आहेत. 

फुप्फुसं हेल्दी राहावीत यासाठी आवश्यक टीप्स

  • दररोज ५-१० मिनिटं दीर्घ श्वास घेऊन सराव करा. Pursed Lip Breathing आणि Belly Breathing सारख्या ट्रिक्स फुप्फुसाची क्षमता वाढविण्यास मदत करतात.
  • गरम पाण्याची वाफ घेतल्याने कफ बाहेर पडतो आणि फुप्फुसं स्वच्छ होताच
  • सिगारेट आणि तंबाखू फुप्फुसांच्या टिश्यूला नुकसान पोहोचवतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो
  • हिरव्या रंगाच्या भाज्या, फळं, बिया आणि ड्रायफ्रूट्स फुप्फुसांवरील सूज कमी करतात आणि त्यांना डिटॉक्स करायला मदत करतात. 
  • नियमित चालणे, सायकलिंग किंवा योगा केल्याने फुप्फुसाची कार्यक्षमता अधिक वाढते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com