जाहिरात

How to shower : आंघोळ करताना सर्वप्रथम शरीरावरील कोणत्या अवयवावर पाणी घ्यावं? आयुर्वेद काय सांगतं? 

आपल्यापैकी अनेकांना शॉवरखाली उभं राहून अंघोळ करायला आवडतं. मात्र अंघोळ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? कारण अंघोळ करण्याची चुकीची पद्धत तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते.

How to shower : आंघोळ करताना सर्वप्रथम शरीरावरील कोणत्या अवयवावर पाणी घ्यावं? आयुर्वेद काय सांगतं? 
मुंबई:

How to shower according to Ayurveda: आपल्यापैकी अनेकांना शॉवरखाली उभं राहून अंघोळ करायला आवडतं. मात्र अंघोळ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? कारण अंघोळ करण्याची चुकीची पद्धत तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. याबाबत पंतजलि योगपीठचे प्रमुख आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna)  यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शॉवरने अंघोळ करण्यामुळे होणारं नुकसान आणि आयुर्वेदातील योग्य पद्धत सांगितली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

शॉवरने अंघोळ करण्यामुळे काय त्रास होऊ शकतो? 

याबाबत उत्तर देताना आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं की, आयुर्वेद आणि भारतीय परंपरेनुसार अंघोळीची योग्य पद्धत सांगण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने अंघोळ केल्यास शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. सध्या लोक बसून अंघोळ करण्यापेक्षा उभ्याने अंघोळ करतात. मात्र हे योग्य नाही. 

शॉवरने अंघोळ केल्याने हार्ट अटॅक किंवा अस्थमाचा धोका असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. जेव्हा तुम्ही थेट डोक्यावर थंड पाणी ओतता तेव्हा मेंदूच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून, शॉवरखाली  अंघोळ करण्याऐवजी पारंपारिक अंघोळ करणे चांगले.

Benefits of drinking hot water गरम पाणी आहे अमृतासमान, फायदे आहेत इतके की थक्क व्हाल

नक्की वाचा - Benefits of drinking hot water गरम पाणी आहे अमृतासमान, फायदे आहेत इतके की थक्क व्हाल

आयुर्वेदानुसार अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती?

अंघोळ करताना सर्वात आधी हात आणि पाय धुवावेत. हळूहळू पाणी शरीरावर घ्या. शेवटी डोक्यावर पाणी ओता. कधीच खूप गरम किंवा खूप थंड पाणी डोक्यावर टाकू नये, यामुळे डोकं आणि मेंदूला नुकसान पोहोचू शकतं.

बसून अंघोळ करण्याचा सल्ला...

आचार्य बालकृष्ण म्हणाले, शक्यतो बसून अंघोळ करावी. जर उभं राहू अंघोळ करीत असाल तरीही आधी हात-पाय धुवा त्यानंतर शरीरावर आणि शेवटी डोक्यावरुन पाणी घ्या. 

या गोष्टी लक्षात ठेवा...

आचार्य पुढे सांगतात की, जेवल्यानंतर लगेच अंघोळ करू नये. नेहमी अंघोळ केल्यानंतर जेवा. ते म्हणतात की आयुर्वेदानुसार, जेवणापूर्वी अंघोळ करणे आवश्यक आहे. आंघोळ केल्याने शरीर शुद्ध होते, पचनशक्ती (जठराग्नी) मजबूत होते आणि अन्न योग्यरित्या पचते. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com