जाहिरात

Benefits of drinking hot water: गरम पाणी आहे अमृतासमान, फायदे आहेत इतके की थक्क व्हाल

Benefits of drinking hot water: थंड पाणी पिणे हे टाळले पाहीजे. पाणी पीत असताना ते कोमट किंवा सहन होईल इतके गरम करून पिणे फायदेशीर ठरते.

Benefits of drinking hot water: गरम पाणी आहे अमृतासमान, फायदे आहेत इतके की थक्क व्हाल
मुंबई:

Benefits of drinking hot water: निरोगी जीवनशैलीसाठी आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये केलेले छोटो बदलही अनेकदा खूप फायदेशीर ठरतात. औषधांपेक्षा हे बदल अनेक रोग किंवा व्यादी दूर करण्यासाठी मदत करत असतात. आयुर्वेदामध्ये गरम पाणी पिण्यास सांगितले जाते. मात्र ते कधी आणि कसे प्यावे हे महत्त्वाचे आहे. गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी फार लाभदायी मानले जाते. गरम पाणी पिण्याचे नेमके फायदे काय आहेत (Benefits of drinking hot water) आणि ते कधी, किती प्यावे हे आपण पाहूया.  

( नक्की वाचा: वयाच्या चाळीशीत दिसाल 25 वर्षांचे; डॉक्टर म्हणतात, पाणी पिण्याच्या या 4 सवयी आताच बदला! )

पाण्यामुळे केवळ तहान भागते असे नाही. पाणी हे शरीरातील प्रत्येक घटकासाठी महत्त्वपूर्ण असते आणि पाणी कमी प्यायल्यास वेगवेगळे त्रास उद्भवतात. थंड पाणी पिणे हे टाळले पाहीजे. पाणी पीत असताना ते कोमट किंवा सहन होईल इतके गरम करून पिणे फायदेशीर ठरते. खासकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. 

(नक्की वाचा:स्वमुत्राने डोळे धुण्याचा नवा ट्रेंड! पुण्यातील महिलेचा मोठा दावा, अनुकरण करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला)

नैसर्गिक डीटॉक्सिफिकेशन 

पाणी प्यायल्याने शरीरातील अपायकारक घटक बाहेर फेकले जातात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अपायकारक घटक घामावाटे किंवा लघवीवाटे बाहेर फेकण्यास मदत होते. याशिवाय गरम पाणी प्यायल्याने अन्न पचनाची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठाची समस्या असलेल्या व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्यामुळे पचन मार्गात चिकटून बसलेले स्निग्ध घटक पातळ होऊन शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास गरम पाणी प्यायल्याने शरीर नैसर्गिकरित्या शुद्ध होते. 

पचन प्रक्रिया सुधारते

पचनसंस्था सुधारण्यासाठी गरम पाणी खूप फायदेशीर असते. अन्नपदार्थांमधील स्निग्ध पदार्थ (fats) आणि तेलकट घटक पातळ करण्यास मदत करते. स्निग्ध, तेलकट पदार्थ पचण्यास जड असतात. जेवणानंतर गरम पाणी प्यायल्यास पोट फुगणे, पोटदुखी अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होते. सोबतच अन्न लवकर आणि अधिक चांगल्या प्रकारे पचते. आतड्यांमधील मल बाहेर फेकण्यासही गरम पाणी मदत करते ज्यामुळे शौचास साफ येते आणि बद्धकोष्ठता, गॅस, अपचन किंवा पोटफुगीसारख्या समस्या होत नाहीत.  

स्नायूंसाठीही फायदेशीर

गरम पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. गरम पाणी रक्तवाहिन्यांना रुंद होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. सोबतच गरम पाण्यामुळे स्नायूदुखी अथवा सांधेदुखीतून काही प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते.  रक्ताभिसरण सुधारल्याने शरीर आणि मन प्रसन्न होण्यास मदत होते आणि तजेलदार वाटू लागते.  

वजनवाढीवर नियंत्रणासही करते मदत

जी मंडळी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तर आवर्जून गरम पाणी प्यायला पाहीजे. कारण यामुळे चरबी विरघळवण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ मिळते, पचन क्रिया सुधारल्याने फॅट जमा होण्याची प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. गरम पाण्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि या सगळ्याचा फायदा वजन करण्यासाठी होत असतो.  

श्वसनमार्गाच्या समस्येवर रामबाण उपाय

गरम पाण्यामुळे  त्वचा छान दिसू लागते. रक्तप्रवाह सुधारल्याने त्वचा नितळ होऊ लागते. मुरुम आणि इतर त्वचेच्या समस्या कमी होण्यासही यामुळे मदत होते. गरम पाणी प्यायल्याने घशाची खवखव कमी होते, बसलेला घसा मोकळा होण्यास मदत होते. छातीत जमा झालेला कफ पातळ होऊन तो बाहेर फेकण्यासाठीही गरम पाणी मदत करते.  

कधी आणि कसे प्यावे गरम पाणी?

गरम पाणी पिण्याचे फायदे मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी एक ग्लास गरम पाणी प्यावे. पाणी इतके गरम असावे की ते पिताना तोंड, जीभ भाजणार नाही याची काळजी घ्यावी. चहा किंवा कॉपी आपण जितकी गरम असताना पितो तितकंच पाणी गरम करून घोट-घोट प्यावे.  दुपारी आणि रात्री जेवण झाल्यानंतरही एक ग्लास गरम पाणी प्यावे. दोन्ही जेवणानंतर नळाचे पाणी किंवा फ्रीजमधले पाणी पिणारे अनेकजण आहे. असं करणं हे अपायकारक ठरू शकतं. त्याऐवजी कोमट अथवा गरम पाणी प्यावे.   
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com