जाहिरात

ऑफिसमध्ये Email करताना मोठी चूक; कोणीही वाचण्यापूर्वी दुरुस्ती कशी कराल? हे फीचर खूप कमी जणांना ठाऊक

फार कमी लोकांना माहीत आहे की, जीमेलमध्ये असं एक ऑप्शन आहे जे तुम्हाला अशा परिस्थितीत मदत करू शकतं.

ऑफिसमध्ये Email करताना मोठी चूक; कोणीही वाचण्यापूर्वी दुरुस्ती कशी कराल? हे फीचर खूप कमी जणांना ठाऊक

अनेकदा ऑफिसमध्ये घाईगडबडीत लोक चुकीच्या व्यक्तीला इमेल पाठवतात किंवा अटॅचमेंटचं Send बटन दाबतात. अशात कळत नाही की आता काय करावं, पाठवलेला इमेल मागे घेता येऊ शकतो का, किंवा कोणी वाचण्यापूर्वी याला Unsend करता येतो का? जर तुम्हीही या गोंधळात असाल तर काय कराल?

Gmail मध्ये Email Unsend कसं कराल? 

फार कमी लोकांना माहीत आहे की, जीमेलमध्ये 'अनडू सेंड' Undo Send नावाचं एक फीचर आहे, जे ईमेल पाठवल्यानंतर काही सेकंदात वापरता येतं. हे फीचर तुम्हाला पाठवलेला ईमेल पूर्ववत करण्याची परवानगी देतं.

अनसेंड कसं करावं

- ईमेल पाठवा

- स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली Undo पर्याय दिसेल

- लगेच Undo वर क्लिक करा

- ईमेल 'ड्राफ्ट्स'मध्ये पुन्हा उघडेल, जिथे तुम्ही तो edit करू शकता किंवा delete करू शकता.

Undo Send वाढविण्याची पद्धत...

जर तुम्हाला वाटतं की, ५ सेकंद पुरेसं असेल तर जीमेलमध्ये ही वाढ वाढवू शकता. 

- Gmail उघडा
- Settings मध्ये जा.
- See all settings निवडा
- Undo Send सेक्शनमध्ये जा.
- Cancellation Period ला 5, 10, 20 किंवा 30 सेकंदापर्यंत सेट करा.
- सेटिंग्ज सेव्ह करा.

Outlook मध्ये पाठवलेला Email  Recall करा कराल
Microsoft Outlook मध्ये Recall Message फीचर उपलब्ध आहे. मात्र प्रत्येक स्थितीत हे फिचर काम करीत नाही.

Recall करण्यासाठी...

- Sent Items उघडा.
- जो ईमेल रद्द करायचा असेल तो उघडा.
- File > Info > Resend or Recall > Recall This Message निवडा.
- हवं तर ईमेल डिलीट करा किंवा नवा इमेल पाठवून त्याला रिप्लेस करा.

नक्की वाचा - NEET मध्ये आलं अपयश, मग करियर बदलून वेगळचं क्षेत्र निवडलं; आता 20 व्या वर्षी 72.3 लाखांचं पॅकेज


Recall कधी काम करेल...

- पाठवणारा आणि प्राप्तकर्ता एकाच मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज किंवा मायक्रोसॉफ्ट ३६५ संस्थेमध्ये असावेत..

- प्राप्तकर्त्याने अद्याप ईमेल वाचलेला नाही.

- सामान्य Gmail, Yahoo किंवा अन्य वैयक्तिक ईमेलवर ही सुविधा  अनेकदा काम करत नाही.


ईमेल पाठवला गेला असेल आणि तो परत घेता येत नसेल तर काय कराल?

जर एखादा ईमेल पूर्णपणे पोहोचला असेल, तर तो परत घेणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही खालील गोष्टी कराव्यात:

- ताबडतोब योग्य माहितीसह एक नवीन ईमेल पाठवा
- चूक गंभीर असल्यास, माफी मागा आणि स्पष्टीकरण द्या

- भविष्यात ईमेल पाठवण्यापूर्वी नेहमी प्राप्तकर्ता, विषय आणि अटॅचमेंट तपासा.

- ईमेल पाठवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

- प्राप्तकर्त्याचा ईमेल पत्ता पुन्हा तपासा.

- विषय योग्य लिहा

- अटॅचमेंट जोडायला विसरू नका

- इमेल पाठवण्यापूर्वी तो संपूर्ण एकदा वाचा.

- Gmail आणि Apple Mail मध्ये 'undo send' वेळ ३० सेकंदांवर सेट करा

  

  

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com