importance of sleep : तुम्ही रात्री उशीरापर्यंत मोबाइल हातात घेऊन जागरण करता? उद्या सुट्टी आहे मग आज जागरण करायला काय हरकत असा विचार करता? आठवड्यात कामाच्या दिवशी अपुरी झोप घेऊन सुट्टीच्या दिवशी झोपून राहता? तुमची झोपच होत नाही. झोपेची वेळ अनियमित आहे. मग तुम्हाला खूप मोठा धोका आहे. कारण अपुऱ्या झोपेमुळे हार्ट फेल होऊ शकतं. पाहूयात नेमकं सत्य काय आहे.
अन्न आणि पाण्याइतकीच मानवी शरीराची महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे झोप. अपुऱ्या झोपेमुळे दिवसाची सुरुवातच निराशाजनक होते. काम करावसं वाटत नाही. अंग आणि खांदे जड झाल्यासारखे वाटतात. कंटाळा वाटतो. उदासवाणं वाटतं. मूड ऑफ होतो. पण ही फक्त थकवा आणणारी गोष्ट नाही. तर या अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या हृदयावर मोठा परिणाम होतो. अगदी हार्ट फेल होण्याचीही भीती आहे.
अपुऱ्या झोपेमुळे हार्ट फेल? l Insufficient sleep
- रक्तदाब वाढतो: झोपेअभावी तणाव वाढतो, रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो
- हृदयाची गती वाढते: विश्रांती न मिळाल्याने हृदय सतत काम करतं
- हार्मोनल असंतुलन: कॉर्टिसॉलसारखे हार्मोन्स वाढतात, जे हृदयासाठी घातक
- रक्तवाहिन्यांमध्ये सूज: रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो
- रोगप्रतिकारक शक्ती कमी: शरीर कमजोर झालं की हृदयविकाराचा धोका वाढतो
- डायबिटीसचा धोका: इन्सुलिनवर परिणाम, रक्तातील साखर अनियंत्रित
- स्मृतिभ्रंश: मेंदूची कार्यक्षमता कमी, एकाग्रतेचा अभाव
- नैराश्य: मूड स्विंग्स, चिडचिड, निरुत्साह
नक्की वाचा - Mobile Use : तुमच्या उशीखालीच मृत्यू लपलाय, वेळीच सावध व्हा; नाहीतर जीवाला धोका!
एका अभ्यासामध्ये असं आढळलंय की अपुरी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका हा 45% अधिक असतो. छातीत दुखणं, धडधडणं, चिडचिड, थकवा अशी लक्षणं दिसू लागतात. अशी झोप अनेक वेळा लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांशी संबंधित असते. यामागे तणाव, अस्वस्थ जीवनशैलीसारखी वैद्यकीय कारणं असू शकतात...
कोणाला किती झोप गरजेची?
वयोगट आवश्यक झोप
नवजात ते 2 वर्ष 10 ते 17 तास
3 ते 5 वर्ष 10 ते 13 तास
6 ते 13 वर्ष 9 ते 11 तास
14 ते 17 वर्ष 8 ते 10 तास
18 ते 64 वर्ष 7 ते 9 तास
65+ वर्ष 7 ते 8 तास
पुरेशा झोपेसाठी टीप्स?
दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या
झोपण्याआधी 1 तास मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप वापरु नका
झोपेचं नियमित वेळापत्रक ठेवा
झोपण्याआधी 10 मिनिटं प्राणायाम, ध्यान किंवा योग करा
मनात विचारांची गर्दी असल्यास, झोपण्याआधी डायरी लिहा
अपुऱ्या झोपेचा किती धोका?
अपुऱ्या झोपेमुळे मानसिक तणाव वाढतो, ज्याचा परिणाम कामाच्या कार्यक्षमतेवर होतो. अपुरी झोप ही फक्त थकवा आणणारी नाही तर गंभीर आजारांना निमंत्रण देणारी आहे. तेव्हा तुमच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा झोपेला प्राधान्य द्या. मात्र लक्षात ठेवा—अतिझोपही तितकीच घातक आहे!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
