Yoga एक्सपर्टने 1 महिना मलासनात बसून प्यायले पाणी, फायदे समजल्यानंतर तुम्हीही कराल सराव

International Yoga Day 2025: योग एक्सपर्टने सलग एक महिना रोज सकाळी मलासनात बसून गरम पाणी पिण्याचा प्रयोग केला. यामुळे त्यांच्या शरीरावर कोणते परिणाम झाले, जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
मलासनाचा सराव केल्यास काय होते?

International Yoga Day 2025: योगाभ्यासामुळे शरीर लवचिक होते शिवाय शरीर आतील बाजूनेही मजबूत होण्यास मदत मिळते. म्हणूनच तज्ज्ञमंडळी नियमित आसनांचा सराव करण्याचा सल्ला आवर्जून देतात. ठराविक आसनांचा सराव नियमित केल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळतील. यापैकी एक आसन म्हणजे मलासन. रोज सकाळी उठल्यानंतर मलासनाचा सराव केल्यास आरोग्यामध्ये कोणकोणते बदल दिसून येतील आणि हे आसन कशा पद्धतीने करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

(नक्की वाचा: पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 आसनांचा करा सराव)

मलासनाचा सराव केल्यास काय होते?

योगगुरू तनूने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर मलासनाशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलंय की, "मी एक महिना सकाळी मलासनामध्ये बसून गरम पाणी पिण्याचा प्रयोग केला". जाणून घेऊया मलासनाचा सराव केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात. 

(नक्की वाचा: International Day of Yoga 2025: आसनांचा सराव करताना पोट रिकामं का असावे? टिप्स फॉलो करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम)

Advertisement

योगगुरूने नेमके काय सांगितले?

  • योग एक्सपर्टच्या मते, मलासनाच्या सराव केल्याने याचा थेट परिणाम त्यांच्या पचनप्रक्रियेवर झाला. सकाळी उठल्यानंतर मलासनात बसून गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या पूर्णतः संपुष्टात आली आणि आतड्यांची हालचाल योग्य पद्धतीने योग्य लागली. मलासनामध्ये बसून कोमट पाणी प्यायल्यास शरीराची आतील बाजूने स्वच्छता होते, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस फ्रेश वाटते. महिलांसाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरू शकते. 
  • तज्ज्ञांचे म्हणणंय की, मलासनाचा सराव केल्यास मासिक पाळीचे चक्र पूर्वीच्या तुलनेत अधिक नियमित झाले आहे. तसेच मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना देखील कमी झाल्या आहेत. 
  • सकाळी उठल्यानंतर मळमळ होण्याचा त्रास होत होता, तो पूर्णतः कमी झालाय.  
  • योगगुरू तनू यांनी हे देखील सांगितले की, मलासनात बसल्याने कंबरेची हालचाल अधिक होऊ लागली. ज्यामुळे बराच वेळ बसून राहणे किंवा उभे राहणे शक्य होऊ लागले. गरम पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळू लागली. संपूर्ण दिवस जास्त सक्रिय आणि मानसिकरित्या अधिक स्थिर असल्याचंही जाणवू लागले. 

तुम्हाला देखील दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करायची असेल तर मलासनामध्ये बसून गरम पाणी पिण्यास सुरुवात करावी. यामुळे पचनप्रक्रिया सुधारेल तसेच शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकून राहील.    

(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)