Whatsapp Multi Account Feature: आता आयफोन वापरणाऱ्या व्हॉट्सॲप युजर्सची प्रतीक्षा संपली आहे. मेटा मालकीच्या व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आणि बहुप्रतिक्षित फीचर्स रोलआउट केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता एकाच आयफोनमध्ये युजर्स दोन वेगवेगळी व्हॉट्सॲप अकाउंट्स वापरू शकणार आहेत. अँड्रॉइड युजर्ससाठी ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध होती, मात्र आता ती आयओएस (iOS) प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
High Blood Sugar : रक्तातील साखर का वाढते? केवळ गोड नाही ही 4 कारणंही आहेत जबाबदार
एकाच ॲपमध्ये दोन प्रोफाइल
या नव्या अपडेटमुळे युजर्सना आता त्यांचे पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळे ठेवणे सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला दोन वेगळे फोन बाळगण्याची गरज भासणार नाही. एकाच व्हॉट्सॲप ॲपमध्ये तुम्ही दुसरे अकाउंट जोडू शकता आणि अगदी सहजपणे एका प्रोफाइलमधून दुसऱ्या प्रोफाइलमध्ये 'स्विच' करू शकता. युजर्सचा गोंधळ होऊ नये म्हणून व्हॉट्सॲपने एक खास बदल केला आहे. आता तुमची प्रोफाइल पिक्चर खालच्या टॅबमध्ये दिसेल, ज्यामुळे तुम्ही सध्या कोणते अकाउंट वापरत आहात हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल.
चॅट ट्रान्सफर आता अधिक सोपे
दुसरे महत्त्वाचे फीचर म्हणजे 'क्रॉस प्लॅटफॉर्म चॅट ट्रान्सफर'. अनेकदा युजर्सना अँड्रॉइडवरून आयफोनवर किंवा आयफोनवरून अँड्रॉइडवर शिफ्ट होताना चॅट बॅकअपची समस्या जाणवत असे. आता कोणत्याही क्लाउड बॅकअपशिवाय युजर्स थेट दोन डिव्हाइसमध्ये मेसेज, फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर करू शकणार आहेत. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि वेगवान बनवण्यात आली आहे.
स्टोरेज मॅनेजमेंटवर मिळणार नियंत्रण
व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी 'फ्री अप स्पेस' हे नवीन स्टोरेज टूलही लाँच केले आहे. यामुळे युजर्सना आता चॅटमधील मोठ्या फाईल्स शोधून त्या हटवणे सोपे जाईल. विशेष म्हणजे, संपूर्ण चॅट डिलीट करण्याऐवजी युजर्स आता फक्त निवडक मीडिया फाईल्स (फोटो किंवा व्हिडिओ) डिलीट करू शकतात आणि महत्त्वाचे टेक्स्ट मेसेज सुरक्षित ठेवू शकतात. यामुळे फोनचे स्टोरेज मॅनेज करणे अधिक सुलभ होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world