आयुष्यात खूप त्रस्त आहात? समाधान मिळत नाहीय? जया किशोरींच्या प्रेरणादायी विचारामुळे बदलेल जीवन

Jaya Kishori Motivational Quotes: मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांचे विचार ऐकल्यास तुमच्या जीवनातील त्रास काही मिनिटांमध्ये दूर होण्यास मदत मिळू शकते. यासाठी तुम्हाला केवळ अशा पद्धतीने समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Jaya kishori Motivational Thoughts: मोटिव्हेशनल स्पीकर (Motivational speaker) जया किशोरी (Jaya Kishori) आणि त्यांचे प्रेरणादायी विचार तरुणवर्गामध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये असतात. जया किशोरी यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी विचारांचे अनुकरण लोक आपल्या जीवनामध्ये करतात. तुमच्या जीवनामध्येही काही समस्या सुरू आहेत का? त्या समस्येवर उपाय मिळत नाहीय का? चिंता करू नका. या लेखाद्वारे आपण जया किशोरी यांचे प्रेरणादायी विचार (Jaya Kishori Quotes To Solve Any Problem) जाणून घेऊया... या विचारांचे अनुकरण तुम्ही तुमच्या जीवनात केले तर कठीण परिस्थितीवर सहजरित्या मात करण्यास तुम्हाला मदत मिळेल.

(नक्की वाचा: Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी)

जया किशोरी म्हणतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चहुबाजूंनी संकट येतात आणि आशेचा एकही किरण दिसत नाही, त्यावेळेस लोक पूर्णतः हताश होऊन जातात. त्रास कमी होण्यासाठी नेमके काय करावे? याचे उत्तर लोकांना सापडत नाही. एखाद्या व्यक्तीचे मन दुःखाने व्यापलेले असेल तेव्हा काही वेळ रडून घ्यावे. यामुळे तुमचे मन मोकळे होईल. समस्या सुटणार नाही पण त्या दुःखामुळे होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.  

कामामध्ये मन गुंतण्यास मिळेल मदत

मन मोकळे करून रडलात की तुमचे महत्त्वाच्या कामामध्ये मन गुंतण्यास मदत मिळेल. कारण कोणत्याही समस्येचे समाधान कठोर परिश्रम करूनच शोधले जाऊ शकते. तुमचे दुःखी मन एकाग्र कसे होईल, यावर आपण काम केले पाहिजे आणि पुन्हा ते काम पूर्णपणे कष्ट व प्रामाणिकपणाने करण्याची इच्छा मनामध्ये असावी. समस्या निर्माण झाली आहे तर त्यावर उपाय शोधा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.  

(नक्की वाचा: Ayushman Bharat Yojanaमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा, कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर)

जया किशोरी का आहेत लोकप्रिय?

अनोख्या आणि खास शैलीमुळे मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी तरुणवर्गामध्ये लोकप्रिय आहेत. इतकेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णावर असलेल्या अपार प्रेमामुळे त्यांना किशोरी ही पदवी मिळाली आहे. श्रीमद्भगवद्गीता ग्रंथातील भगवान श्रीकृष्णांचे उपदेश त्या भाविकांना अतिशय सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगतात.  

Advertisement

(नक्की वाचा: तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन)

VIDEO: वाढत्या उष्णतेमुळे वैयक्तिक आयुष्यात वादळ, मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक वास्तव