90 च्या दशकात करिष्मा कपूर झाली होती सडपातळ! झरझर घटवलं होतं 25 किलो वजन, 'तो' डाएट प्लॅन वाचा एका क्लिकवर

Karishma Kapoor Weight Loss Diet : बॉलिवूड इंडस्ट्रीत जबरदस्त फॅशन आणि अष्टपैलू अभिनयाची छाप टाकणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. 90 च्या दशकात करिष्माचे अनेक चित्रपट गाजले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Karishma Kapoor Weight Loss Plan
मुंबई:

Karishma Kapoor Weight Loss Diet : बॉलिवूड इंडस्ट्रीत जबरदस्त फॅशन आणि अष्टपैलू अभिनयाची छाप टाकणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. 90 च्या दशकात करिष्माचे अनेक चित्रपट गाजले. पण करिष्माला तिचं अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. वजन कमी करण्यासाठी करिष्माने सकस आहार घेणं सुरु केलं होतं. करिष्माच्या या डाएट प्लॅनची तुफान चर्चा रंगली होती. कारण करिष्माने एक प्रभावी उपायोजना आखली होती, जी अनेकांनी त्यांच्या डाएटमधून वगळली होती. करिष्माने तिच्या डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश केला होता, ज्यामुळे तिचं तब्बल 25 किलो वजन कमी झालं, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

मासे आणि भात खाऊन करिष्माने घटवलं 25 किलो वजन 

करिष्मा कपूरने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, दिवसभरात फक्त मच्छी करी आणि भात खाऊन 25 किलो वजन कमी केलं होतं. त्यानंतर तिने केळं आणि चिकूसारख्या फळांचं सेवनही केलं. ही फळे वजन वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. पण करिष्माने तिच्या डाएटमध्ये या फळांचा समावेश केला अन् वजनावर नियंत्रण मिळवलं. करिष्माने म्हटलं होतं की, वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट करणे आवश्यक आहे. पण तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार प्रत्येक डाएट वेगवेगळ्या स्वरुपाचा असू शकतो. अशातच कोणत्याही डाएटला फॉलो करण्यासाठी डाएटिशियनचा सल्ला घेणे आवश्यक असतं. 

नक्की वाचा >> अजिबात घाबरू नका! Diabetes नियंत्रणात राहणार, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' रामबाण उपाय एकदा नक्की वाचा

मासे आणि भाताची खासीयत जाणून घ्या

मासे आणि भात एकत्रित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हे एक हेल्दी कॉम्बिनेशन आहे. मासे प्रोटिनचा एक चांगला स्त्रोत आहे. तर भातामध्ये कमी कॅलरी आणि जास्त प्रमाणात फायबर असतं. यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. मासे आणि भात खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते. यामुळे कब्ज आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून बचाव होतो. तर भात एक ग्लूटेन-फ्री धान्य आहे, जे पोटासाठी उपयुक्त असतं. भातामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं, ज्यामुळे पचक्रिया चांगली राहते. 

केळं आणि चिकू वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं?

केळं फायबरचा एक उत्तम सोर्स आहे आणि यामध्ये फॅटचं प्रमाण खूपच कमी असतं. याच्या सेवनामुळे तुम्हाला खूप जास्त भूख लागत नाही.तसच तुम्हाला अतिरिक्त कॅलरीज असणारे जंक फूड खाण्याची आवश्यकता भासत नाही. चिकूमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्या सेवनामुळे भुखेवर नियंत्रण मिळतं आणि ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. 

Advertisement
Topics mentioned in this article