How Do I Know If I Have Bad Gut Health: पोट खराब असणं अनेक आरोग्याच्या समस्यांचं कारण ठरू शकतं. पोट केवळ अन्न पचवण्याचं काम करीत नाही तर याचा संबंध संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी असते. पोटातील चांगले बॅक्टेरिया पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करते. अशात बॅक्टेरिया असंतुलित झाल्या तर शरीरात अनेक समस्या दिसू लागतात. या लेखात जाणून घेऊया गट हेल्थ खराब होण्याची लक्षणं काय आहेत?
पोट खराब झालं तर काय होतं?
पोटासंबंधित त्रास - जेवल्यानंतर जर तुम्हाला नियमित पोट जड वाटत असेल किंवा पोट फुगत असेल तर तुमच्या पोटातील गट बॅक्टेरियामध्ये असंतुलन झाल्याची शक्यता असू शकते. चांगलं गट हेल्थ असेल तर अन्न सहजपणे पचतं. मात्र गट हेल्थमध्ये काहीही बिघाड झाल्यास पचन प्रक्रिया धीमी होते, ज्याचा थेट परिणाम तुमचा उत्साह आणि मूड दोन्हीवर होऊ शकतो.
सतत झोप येणे
पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला थकायला होतं असेल तर याचं कारण खराब गट हेल्थही असू शकतं. गटमध्ये सेरोटोनिन नावाचं हार्मोन असतं, जे मूड आणि झोपेवर नियंत्रण ठेवते. खराब गट हेल्थमुळे थकवा, झोप आणि चिंता सारख्या समस्येचं कारण ठरू शकतं.
त्वचेच्या समस्या
गट हेल्थ चांगलं असेल तर त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसू लागतो. पचन व्यवस्थेत बिघाड झाला असेल तर त्वचेवर पिंपल्स, रॅशेस किंवा कोरडेपणा दिसू लागतो.
नक्की वाचा - Rice Flour Bhakari : 15 दिवस सलग तांदळाची भाकरी खाल्ल्याने काय होईल? फायदे वाचून तुम्हीही आजपासून सुरू कराल
वजन
तुमचं पोट योग्य पद्धतीने काम करीत नसेल तर शरीर पोषण तत्व शोषून घेऊ शकत नाही. ज्यामुळे वजन वाढतं किंवा वजन कमी होतं. यामागे पचनासंबंधित कारण असू शकतं.
मूड स्विंग
खराब पचनामुळे मूड स्विंग, तणाव, चिंता आणि कधी कधी नैराश्यासारख्या समस्येचं कारण ठरू शकतं.
(NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
