कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार (Kolkata Rape Murder) आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश महिला व त्यांच्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत आहे. प्रत्येक देशवासीयाच्या मनात खूप राग आहे. दुसरीकडे सीबीआयने या प्रकरणातील आरोपी संजय रॉयचे (Sanjay Roy) मनोविश्लेषणात्मक प्रोफाइल तयार केले आहे. यानंतर आरोपीची सायकोलॉजिकल ऑटोप्सी टेस्ट (Psychological Autopsy Test) करण्यात आली. यादरम्यान असे काही खुलासे समोर आले आहेत की तपास यंत्रणाही सावध झाली आहे. आरोपी संजय रॉयच्या मोबाइल फोनमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या, ज्यामध्ये हिंसक पद्धतीने केलेले शारीरिक संबंध आणि अश्लील व्हिडीओंचा समावेश होता.
यानंतरच्या चौकशीदरम्यान तपास यंत्रणेने संशय व्यक्त केला की आरोपी सॅटरायसिस हायपरसेक्सुअॅलिटी (Satyriasis Hypersexuality) आजाराने ग्रस्त असावा. सॅटरायसिस हायपरसेक्सुअॅलिटी हा एक मानसिक विकार आहे, ज्यामध्ये रुग्ण स्वतःच्या अनियंत्रित लैंगिक इच्छांच्या नियंत्रणाखाली येते. नेमका काय आहे हा आजार, याची लक्षणे आणि कारणे? सविस्तर माहिती जाणून घेऊया...
(नक्की वाचा: VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं?)
हायपर सेक्सुअॅलिटी आजार काय आहे?
हायपर सेक्सुअॅलिटी आजार म्हणजे वारंवार लैंगिक इच्छा होणे आणि अचानक वाढणे. कल्पना, इच्छा किंवा क्रियेवर तीव्र स्वरुपात लक्ष केंद्रित करणे; ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. हा विकार अनेकदा आरोग्य, नोकरी, नातेसंबंध किंवा तुमच्या जीवनातील अन्य गोष्टींसाठी त्रासदायक ठरू शकता आणि समस्याही निर्माण करू शकतो.
या आजारामध्ये अनेक प्रकारच्या लैंगिक कल्पना व क्रियांचा समावेश असतो. हायपर सेक्सुअॅलिटी (Satyriasis Hypersexuality) असलेले लोक अनेकदा त्यांच्या इच्छा कमी करण्यात किंवा नियंत्रित करण्यामध्ये अपयशी ठरतात. जर तुम्ही तुमच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर ही एक मोठी समस्या आहे.
यास क्लिनिकल कंडिशन मानले जावे की नाही? यावर अजूनही वादविवाद सुरू आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती लैंगिक गोष्टींबाबत खूप विचार करत असते आणि लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा अशा समस्या उद्भवतात.
(नक्की वाचा: Exclusive: अश्लील Video पाहिले, रेड लाईट एरियात गेला...कोलकात्याच्या आरोपीचा हैराण करणारा रिपोर्ट)
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, सॅटरायसिस हा पुरुषांमधील पॅथॉलॉजिकल हायपरसेक्सुअॅलिटीस (Pathologic Hypersexuality) वर्णन करणारा शब्द आहे. या अभ्यासामध्ये सॅटरायसिस आजाराने ग्रस्त असलेल्या 24 वर्षीय पुरुषाचा समावेश करण्यात आला होता. ऑर्गेनिक एटिओलॉजीचा शोध अपयशी ठरल्यानंतर, रुग्णावर मेड्रोक्सीप्रोजेस्टेरॉन एसीटेट आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने उपचार केले गेले, ज्यामुळे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसले.
महिलांमध्येही आढळतो हा आजार
महिलांमध्येही सॅटरायसिस हायपरसेक्सुअॅलिटी (Satyriasis Hypersexuality) हा आजार आढळतो. प्राचीन काळामध्ये ज्या स्त्रियांच्या लैंगिक इच्छा अनियंत्रित व्हायच्या त्यांच्याकरिता निम्फोमॅनियाक (nymphomaniac) हा शब्द वापरला जात असे. सामान्यतः जेव्हा लोक लिंगाचा विचार न करता अनियंत्रित लैंगिक इच्छा बाळगतात तेव्हा अशा रुग्णांना हायपरसेक्सुअॅलिटी नावाच्या विकाराने ओळखले जाते. हा प्रकार एखाद्या व्यसनाप्रमाणे असतो. हा विकार असणारे लोक सामान्य जीवन जगू शकतात. पण या सवयीमुळे त्यांच्या आणि इतरांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ लागतात, तेव्हा समस्या निर्माण होऊ शकते.
कम्प्लसिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअर या प्रकारास हायपर सेक्सुअॅलिटी किंवा लैंगिक संबंधांचे व्यसन म्हटले जाते. हा प्रकार म्हणजे लैंगिक कल्पना, इच्छा किंवा क्रियांवर तीव्र स्वरुपात लक्ष केंद्रित करते ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. यामुळे तुमचे आरोग्य, नोकरी, नातेसंबंध किंवा रुग्णाच्या जीवनातील इतर गोष्टींसाठी परिणाम होऊ शकतात.
हायपर सेक्सुअॅलिटी किंवा कम्प्लसिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअरमध्ये विविध प्रकारच्या लैंगिक बाबींचा समावेश असू शकतो. उदाहरणांमध्ये हस्तमैथुन, एकापेक्षा अधिक पार्टनर, अश्लील व्हिडीओ किंवा पैसे देऊन शारीरिक संबंध ठेवणे, इत्यादी... पण या कामुकता जेव्हा जीवनाचा केंद्रबिंदू होतो, ज्यावर नियंत्रण ठेवणे कठीण ठरते, त्यावेळेस अडचणी निर्माण होऊ शकतात. दरम्यान योग्य औषधोपचार आणि स्वतःच्याच मदतीने तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता. यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया...
कम्प्लसिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअर आजाराची लक्षणे (Compulsive Sexual Behavior - Symptoms and Causes)
- वारंवार आणि तीव्र स्वरुपातील लैंगिक कल्पना, इच्छा निर्माण होतात आणि यावेळेस स्वतःवर नियंत्रण राहत नाही.
- लैंगिक क्रिया पूर्ण करण्यासाठी रुग्णांच्या मनात वारंवार इच्छा निर्माण होतात, इच्छा पूर्ण झाल्यानंतर तणावमुक्त झाल्यासारखे वाटते. पण यानंतर पश्चातापही होतो.
- एकटेपणा, नैराश्य, चिंता किंवा तणाव यासारख्या समस्या टाळण्यासाठी लोक जबरदस्तीने लैंगिक इच्छा पूर्ण करण्याची पद्धत वापरतात.
- गंभीर समस्यांचे कारण ठरत असतानाही लोक लैंगिक क्रियांमध्ये गुंतून राहतात. यामुळे एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्याची तसेच रुग्णामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
- महत्त्वाचे नातेसंबंध तुटणे, कामामध्ये समस्या निर्माण होणे, आर्थिक समस्या किंवा कायदेशीर समस्या यासारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
- निरोगी आणि स्थिर नातेसंबंध तयार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
डॉक्टरांशी संपर्क कधी साधावा?
तुम्हाला तुमच्या लैंगिक क्रियावर नियंत्रण ठेवणे कठीण वाटत असल्यास , विशेषत: तुमच्या वागणुकीमुळे तुम्हाला किंवा इतर लोकांसमोर समस्या निर्माण होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. हायपर सेक्सुअॅलिटी किंवा कम्प्लसिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअर आजारावर वेळीच उपाय न केल्यास कालांतर वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. भविष्यातील समस्या टाळण्यासाठी यावर वेळीच औषधोपचार सुरू करावेत.
(नक्की वाचा: Kolkata Doctor Murder : काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा)
कम्प्लसिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअर आजारामागील कारणे (Causes)
कम्प्लसिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअर आजारामागील नेमकी कारणं स्पष्ट नसली तरी ही कारणे असू शकतात...
मेंदूच्या मार्गातील बदल
हायपर सेक्सुअॅलिटीसह कालांतराने मेंदूच्या मार्गांमध्ये बदल घडवून आणू शकतात, ज्यास न्यूरल सर्किट असेही म्हणतात. म्हणजे समाधान मिळेपर्यंत लैंगिक सामग्री आणि उत्तेजनाची अधिक प्रमाणात आवश्यकता असते.
नॅचरल ब्रेन केमिकलमधील समतोल ढासळणे
मानवी मेंदूमध्ये न्युरोट्रान्समीटर नावाची काही रसायने असतात, उदाहरणार्थ सेरोटोनिन, डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन जे आपला मूड नियंत्रित करतात. जेव्हा या हार्मोनची पातळी असंतुलित होते त्यावेळेस लैंगिक इच्छा तसेच क्रियांवर परिणाम होऊ शकतो.
- अमली पदार्थांचे सेवन
- मानसिक विकार
- कौटुंबिक संघर्ष
- शारीरिक किंवा लैंगिक शोषणाची पार्श्वभूमी