जाहिरात

Law Stories : शरीरसंबंध ठेवतो अन् कोर्टात घटस्फोटाची मागणी; नवऱ्याच्या एका रेकॉर्डिंगमुळे केसचा लागला निकाल

घटस्फोटाची केस सुरू असतानाही पती घरात पत्नीकडून शरीरसुखाची मागणी करीत होता.  यामागे त्याला विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. 

Law Stories : शरीरसंबंध ठेवतो अन् कोर्टात घटस्फोटाची मागणी; नवऱ्याच्या एका रेकॉर्डिंगमुळे केसचा लागला निकाल

Law Stories :  लग्नाचं नातं हे एकमेकांवरील विश्वास आणि प्रेमावर टिकलेलं असतं. कंटाळा आला, किंवा समोरचा पटला नाही म्हणून भातुकलीच्या खेळाप्रमाणे लगेच तोडताही येत नाही. दोघांनीही एकमेकांना सांभाळून घेणं आवश्यक असतं. वकील मधुरा देशपांडे यांनी त्यांच्याकडे आलेल्या गुंतागुतींच्या केसचा उलगडा 'ऑर्डर ऑर्डर पॉडकास्ट' या युट्यूब चॅनलवर केला आहे. हे प्रकरण प्रेम विवाह केलेल्या आणि २५ वर्षे लग्नात राहिलेल्या दाम्पत्याचं होतं. घटस्फोटाची केस सुरू असतानाही पती घरात पत्नीकडून शरीरसुखाची मागणी करीत होता.  यामागे त्याला विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. 

पतीच्या जुन्या मोबाइलमधील मेसेज पाहिले अन् पत्नी हादरली...

२५ वर्षे हे दाम्पत्य लग्नात होते. दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. कुटुंबाकडून पाठिंबा नसल्यानं दोघांनी पळून जात लग्न केलं. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले. महिलेच्या पतीचं इंजिनियरिंगचं करियर चांगलं चालत होतं. त्यादरम्यान महिलेने मात्र पूर्णपणे घराकडे लक्ष देण्याचं ठरवलं. चांगली संपत्ती जमा झाली. या दाम्पत्याला दोन मुलंही झाली. दरम्यानच्या काळात मोठ्या मुलाला लिव्हर ट्रान्सप्लान्टची गरज असल्याचं लक्षात आलं. महिलेने मुलासाठी आपल्या लिव्हरचा काही भाग दिला. त्यावेळी तिच्याही आयुष्यात शारिरीक आणि मानसिक अनेक बदल झाले. त्याचा परिणाम संसारावरही होत गेला. 

तिची मोठी सर्जरी झाली. यासाठी महिलेच्या माहेरच्या कुटुंबानेही बरीच मदत केली. शेवटी हे लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झालं. यादरम्यान पती-पत्नीमधील शरीरसंबंध होत नव्हते. यादरम्यान पतीचं ऑफिसमधील एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंधं सुरू झाले. ही बाब पतीच्या एका मोबाइलमधून समोर आली. पतीने आपला जुना मोबाइल मोठ्या मुलीला वापरायला दिला होता. त्या ९ वीतील मुलीने वडिलांचे काही मेसेजच पाहिले. ज्यावरुन वडिलांचे त्यांच्या ऑफिसमधील तरुणीसोबत रिलेशनशिप असल्याचं उघड झालं. याबाबत पत्नीने पतीला विचारणा केली. मात्र त्याच्या वागणुकीतून हे प्रकर्षाने दिसत होतं.  मात्र नवरा यातून बाहेर पडेल असा विश्वास पत्नीला वाटत होता. 

नक्की वाचा - Law Stories : आधीच विवाहित, नवरा बेपत्ता, मुलीसोबत आईचंही अफेयर; डोकं चक्रावून टाकणारं प्रकरण

दरम्यान पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली. त्यात याने ज्या घटना कधी घडल्याच नाहीत, त्याचा उल्लेख केला. यात पत्नीला पुढे शिक्षण घ्यायची इच्छा नाही, ती मुलांसोबत इंग्रजीत बोलत नाही यांसारख्या गोष्टींचा उल्लेख केला होता. आमच्यातील शरीरसंबंध थांबल्याचं त्याने यात  म्हटलं. नवरा घटस्फोट मागतोय असं म्हटल्यावर ती एकदा त्याच्याशी बोलली. मात्र त्याने काहीही कारण सांगितलं नाही आणि घटस्फोट हवं असल्याचं सांगितलं. त्यादरम्यान ती १० ते १५ हजारात एका शाळेत नोकरी करीत होती. नवऱ्याने मात्र मुलांचं शिक्षण करेन, मात्र तुला काही देणार नसल्याची अट घातली होती. त्यामुळे महिलेसमोर भविष्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. 

न्यायालयात घटस्फोटाची मागणी आणि घरात पत्नीसोबत शरीरसंबंध...

यादरम्यान महिलेने वकिलांना एक धक्कादायक गोष्ट सांगितली. पती अनेकदा घरात चांगलं वागतो, पाडव्याला माझ्याकडून ओवाळून घेतो आणि पतीचा वाढदिवस आम्ही एकत्र साजरा केला. महत्त्वाचं म्हणजे कोर्टात घटस्फोटाची केस सुरू असताना पती घरात पत्नीकडून शरीरसुखाची मागणी करीत होता. आणि दोघेही एकत्र येत होते. या विरोधाभासी गोष्टीमुळे महिलेला नेमकं काय हवंय याबाबत वकिलाकडून विचारणा करण्यात आली. मात्र दुसरीकडे एकत्र आनंदात असताना तो पत्नीचं भविष्य सुरक्षित राहिलं असं काहीही वागत नव्हता. 

दरम्यान कोर्टात वकिलांच्या क्रॉसदरम्यान पतीने शरीरसंबंध झाल्याचं नाकारलं. अशावेळी पत्नीने एकदा खासगीत त्याला याबाबत विचारणा केली आणि त्याचं म्हणणं रेकॉर्ड केलं. यावर त्याने दिलेलं उत्तर अनेकांसाठी धक्कादायक होतं. आपण अद्याप तरी एकाच घरात राहतो. अद्याप तू माझी बायको आहेस. त्यामुळे आपल्यात शरीरसंबंध येतात, यात काही विशेष नसल्याचं त्याने म्हटलं. 

नक्की वाचा - Law Stories : बायको जाड झाली, नॉनव्हेज खात नाही म्हणून घटस्फोटाची मागणी, कोर्टाने मान्य केलं का?

हे रेकॉर्डिंग केसमधील टर्निंग पॉइंट होतं. हे रेकॉर्डिंग, काही फोटो कोर्टात दाखल करण्यात आले. यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. न्यायाधीशांनीही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याने ऐकलं नाही. तो घरामधून बाहेर पडला आणि दुसरीकडे जाऊन राहू लागला. त्याचा इगो या संपूर्ण प्रकरणात दुखावला गेला होता. 

शेवटी प्रकरण पत्नीच्या बाजूने फिरलं होतं. सुरुवातीला पतीची पत्नीला काहीही देण्याची तयारी नव्हती. शेवटी पत्नीला घर देण्याची अट त्याने मान्य केली. याशिवाय मुलीचं शिक्षण, तिचं लग्न याचा खर्च करणार असल्याचंही सांगितलं. त्याशिवाय एक मोठी रक्कम पत्नी आणि मुलासाठी देण्यास तो तयार झाला. महिलेसाठी लग्नातून बाहेर पडणं हा खूप मोठा निर्णय होता. पतीची विनवणी करुनही तो एकत्र राहण्यास तयार होत नव्हता. शेवटी तिने स्वत:च्या आयुष्याचा विचार करताना मोठा निर्णय घेतला. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com