जाहिरात

LinkedIn Research: नोकरी शोधणाऱ्या तरुणांना दबावात असताना फसवणुकीचा धोका, लिंक्डइनचा अहवाल

लिंक्डइनच्या ताज्या संशोधनानुसार, भारतातील 82 टक्के प्रोफेशनल्स नोकरी शोधताना फसवणुकीबाबत अधिक सावध झाले आहेत. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेले 'जेन झी' (Gen Z) नोकरी शोधणारे अजूनही दबावाखाली फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता जास्त आहे.

LinkedIn Research: नोकरी शोधणाऱ्या तरुणांना दबावात असताना फसवणुकीचा धोका, लिंक्डइनचा अहवाल

नोकरी शोधणे आता पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे, केवळ स्पर्धेमुळेच नाही तर वाढत्या ऑनलाइन फसवणुकीमुळेही अडचणी वाढल्या आहेत. लिंक्डइनच्या (LinkedIn) नवीन संशोधनातून एक सकारात्मक चित्र समोर आले आहे की, भारतातील प्रोफेशनल्स आता नोकरीच्या जाहिरातींच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, तरुणांमध्ये नवीन संधी मिळवण्याचे दडपण इतके जास्त आहे की, अनेकदा ते धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत.

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

भारतातील 82 टक्के प्रोफेशनल्स आता कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी ती पोस्ट खरी आहे की नाही, याची खात्री करतात. 53 टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत आता ते नोकरीच्या जाहिरातींवर अधिक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तर जवळपास 49 टक्के तरुणांनी मान्य केले आहे की, ते नोकरीच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकता अडकता वाचले आहेत. याउलट Gen Z मध्ये हे प्रमाण 36 टक्के आहे.

लिंक्डइनच्या जॉब सर्च सेफ्टी पल्समधील निष्कर्षांवरून दिसून येते की, नोकरी शोधणाऱ्यांमध्ये फसवणुकीबाबत जागरूकता वाढत आहे. पण, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या तरुण प्रोफेशनल्‍ससाठी हा धोका अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. जागरूकता वाढत असली, तरी नवीन संधी मिळवण्याच्या दबावामुळे अनेकदा सावधगिरीकडे दुर्लक्ष केले जाते, विशेषतः करिअरच्या सुरुवातीच्या काळात हे प्रकर्षाने जाणवते.

(नक्की वाचा-  Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)

करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असणारे तरुण अजूनही काही विशिष्ट प्रसंगी फसवणुकीला बळी पडू शकतात. 54 टक्‍के जेन झी नोकरी शोधणाऱ्यांनी मान्य केले आहे की, एखादी संधी सोडण्यासारखी नसते किंवा अत्यंत महत्त्वाची वाटते, तेव्हा त्यांनी अनेकदा धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून स्पष्ट होते की, घाई आणि स्पर्धा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव पाडू शकतात.

कधी वाटते सर्वाधिक भीती?

नोकरी शोधणाऱ्यांपैकी     18 टक्के तरुण असे आहेत, ज्यांना एखादा रिक्रूटर किंवा कंपनी सुरुवातीला संपर्क साधते तेव्हा फसवणुकीची सर्वाधिक चिंता वाटते. संशोधनानुसार, 90 टक्के वेळा फसवणूक करणारे सदस्य संभाषणाला विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरून वैयक्तिक मेसेजिंग अॅप्सवर नेण्याचा प्रयत्न करतात, जिथे पडताळणी करणे कठीण असते.

(नक्की वाचा-  Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात)

लिंक्डइनचे सुरक्षा कवच

लिंक्डइन इंडियाच्या लीगल अँड पब्लिक पॉलिसी प्रमुख अदिती झा यांनी म्हटलं की, "केवळ जागरूकता पुरेशी नाही, तर प्रबळ सुरक्षा उपाय असणे आवश्यक आहे." म्हणूनच लिंक्डइन बनावट खाती आणि जाहिराती नोकरी शोधणाऱ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखते. कंपन्या आणि रिक्रूटर्ससाठी 'व्हेरिफिकेशन बॅज' देण्याचं कामही लिंक्डइनकडून केलं जातं. तसेच हाय-रिस्क जाहिराती देणाऱ्यांसाठी ओळखपत्र (ID) पडताळणी अनिवार्य करते.

नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले

  • जर एखादी ऑफर खूप आकर्षक किंवा घाईघाईची वाटत असेल, तर विचार करण्यासाठी वेळ घ्या.
  • कंपनीचे अधिकृत पेज आणि रिक्रूटरच्या प्रोफाइलवरील व्हेरिफिकेशन बॅज तपासा.
  • व्हॉट्सअॅप किंवा इतर खासगी अॅप्सवर संवाद साधण्यापूर्वी सावध राहा.
  • संशयास्पद वाटणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजेसची त्वरित तक्रार करा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com