जाहिरात

Todays Gold Rate: सोन्याचा पुन्हा नवा उच्चांक! सुवर्णनगरी जळगावमध्ये दर किती? जाणून घ्या आजचा भाव

अमेरिकन फेडरल बँकेच्या आगामी बैठकीत व्याजदर कमी होण्याचे संकेत यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे.

Todays Gold Rate: सोन्याचा पुन्हा नवा उच्चांक! सुवर्णनगरी जळगावमध्ये दर किती? जाणून घ्या आजचा भाव

Jalgaon Gold Market Todays Rate:  जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. याच कारणामुळे सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्येही याचे पडसाद उमटले असून, आज २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा १ लाख १० हजारांच्या पुढे गेले आहेत, तर २२ कॅरेट सोन्यानेही एक लाखांचा टप्पा पार केला आहे.

सराफा व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे व्यापारविषयक धोरण, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत नीचांकी स्तरावर घसरलेले मूल्य आणि अमेरिकन फेडरल बँकेच्या आगामी बैठकीत व्याजदर कमी होण्याचे संकेत यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या मागणी आणि दरावर होत आहे, ज्यामुळे सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.

GST on Gold: ​सोन्यावर किती जीएसटी लागणार? 1 लाखांच्या सोन्यावर किती कर?

जळगावमधील आजचे (शुक्रवार, ५ सप्टेंबर) सोन्या-चांदीचे भाव खालीलप्रमाणे आहेत:

  • २४ कॅरेट सोन्याचे भाव: जीएसटीशिवाय ₹१,०६,९००, जीएसटीसह ₹१,१०,१०७.

  • २२ कॅरेट सोन्याचे भाव: जीएसटीशिवाय ₹९७,७९२, जीएसटीसह ₹१,००,८५७.

  • चांदीचे भाव: जीएसटीशिवाय ₹१,२४,५००, जीएसटीसह ₹१,२८,२४०.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, चांदीने प्रति किलो ₹१,२८,००० चा टप्पा ओलांडला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अरे बापरे! 8 किलो सोने, 40 किलो चांदी लुटली, उद्योगपती लड्डा यांच्या तिजोरीत खड्डा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com