
Today bank holiday or Not : राज्यात आज, 7 जुलै रोजी बँक आज सुरु असणार की नाही, असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. देशाच्या अनेक भागात मोहरमचा सणानिमित्त बँक सुरू राहतील की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे तुम्ही बँकेशी संबंधित काही महत्त्वाच्या कामासाठी शाखेत जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
यावर्षी मोहरम रविवार, 6 जुलै रोजी आहे. आधीच रविवार असल्याने आणि देशभरातील रविवारी बँका बंद असल्याने मोहरमनिमित्त आज वेगळी बँक सुट्टी नाही. म्हणजेच, बँका सामान्य दिवसांप्रमाणे सोमवारीही खुल्या राहतील. काही राज्ये त्यांच्या परंपरा आणि स्थानिक नियमांनुसार सुट्ट्या लागू करू शकतात.
(नक्की वाचा- Satara News: अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा कामगार कसा बनला करोडपती?)
मोहरमची तारीख इस्लामिक कॅलेंडरनुसार ठरवली जाते, जी चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते. इस्लामिक नवीन वर्ष देखील याच दिवशी सुरू होते. 2025 मध्ये मोहरमची संभाव्य तारीख 6 जुलै होती. परंतु जर चंद्र उशीरा दिसला तर ती सुट्टी 7 जुलै (सोमवार) देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मोहरम सण रविवारीच झाल्याने सोमवारी वेगळी नसणार आहे. त्यामुळे बँक सुरू राहतील.
(नक्की वाचा- Government Job : SBI मध्ये अधिकारी बनण्याची संधी; 541 जागांसाठी मेगा भरती, कुठे कराल अर्ज?)
जुलै महिन्यात येणारे इतर महत्त्वाचे दिवस कोणते?
- आषाढी एकादशी- 6 जुलै, रविवार
- मोहरम- 6 किंवा 7 जुलै
- संकष्ट चतुर्थी- 14 जुलै,सोमवार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन-18 जुलै,शुक्रवार
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती-23 जुलै,बुधवार
- संत सावता माळी पुण्यतिथी- 23 जुलै,बुधवार
- श्रावण मासारंभ- 25 जुलै,शुक्रवार
- विनायक चतुर्थी- 28 जुलै,सोमवार
- नागपंचमी- 29 जुलै,मंगळवार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world