
Mahashivratri 2025 : देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांचं (Jyotirlinga in Maharashtra) अनन्यसाधारण (How many Jyotirlinga in Maharashtra) महत्त्व आहे. देशातील महत्त्वाच्या सणांमध्ये महाशिवरात्रीचा समावेश आहे. या दिवशी मोठ्या भक्तीभावाने महादेवाची पूजा-अर्चा केली जाते. यादिवशी महिला-पुरुष सारेचजण उपवास करतात. शिव आणि पार्वतीचं लग्न झालं त्यानिमित्ताने महाशिवरात्रीच्या सणाचं विशेष महत्त्व आहे. काही मान्यतेनुसार, शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पृथ्वीवरील एक वर्ष हे स्वर्गलोकातील एक दिवस असतो. शिव हा रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात. यादिवशी शंकराच्या पिंडाची पूजा केली जाते. दरम्यान देशभरात 12 ज्योतिर्लिंग असून यापैकी महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमा होते.
नक्की वाचा - Mahashivratri 2025 : अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या देशातील पाचव्या ज्योतिर्लिंगाची काय आहे आख्यायिका?
देशातील 12 ज्योतिर्लिंग कोणते आणि कुठल्या राज्यात आहेत?
पहिलं ज्योतिर्लिंग गुजरातचं सोमनाथ
दुसरं आंध्रप्रदेशचं मल्लिकार्जुन
तिसरं मध्यप्रदेशचं महाकालेश्वर
चौथं मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर
पाचवं महाराष्ट्रातील वैद्यनाथ
सहावं महाराष्ट्रातील भीमाशंकर
सातवं तामिळनाडूतील रामेश्वर
आठवं महाराष्ट्रातील नागनाथ
नववं उत्तर प्रदेशातील विश्वेश्वर
दहावं महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर
अकरावं उत्तराखंडमधील केदारनाथ
बारावं महाराष्ट्रातील घृष्णेश्वर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world