जाहिरात

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण

Makar Sankranti 2026: यंदाची मकरसंक्रांती अत्यंत शुभ मानली जात आहे, कारण या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण
"Makar Sankranti 2026: मकरसंक्रांती राशीभविष्य| 14th January"
Canva
  • मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात.
  • सूर्यदेवांची पूजा केल्यास जीवनात सकारात्मक येईल.
  • सूर्यदेवाकडून आरोग्य आणि दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Makar Sankranti 2026 Shubh Yog: सध्या देशभरात मकरसंक्रांतीची तयारी सुरू आहे. दरवर्षी मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. या पवित्र दिवशी भाविक पहाटे तीर्थस्थानी स्नान करतात, सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करतात आणि गंगामातेची श्रद्धेने पूजा करतात. यंदाच्या मकरसंक्रांतीच्या दिवशी तीन राशींना शनिदेवाचा आशीर्वाद मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि भाग्योदय होण्याची शक्यता आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी जुळून आले शुभ योग | Makar Sankranti 2026 Rashibhavishya 

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तसेच आरोग्य आणि दीर्घायुष्याचे वरदान मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी दान-पुण्य, तप आणि सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यंदाची मकर संक्रांती अतिशय शुभ मानली जातेय. कारण सूर्यदेव शनीच्या राशीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे काही ठराविक राशीच्या लोकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. शनिदेव या मकर संक्रांतीला काही राशींवर विशेष कृपादृष्टी ठेवणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी यंदांची मकरसंक्रांती शुभ ठरणार आहे. 

1. मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते. जीवनाला नवी दिशा मिळू शकते. भविष्यकालीन योजना आणि गुंतवणुकीबाबत विचार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल तसेच दान-पुण्याची संधीही मिळेल. या मकरसंक्रांतीला उत्पन्नाचे नवे मार्ग खुली होऊ शकतात. पण या काळात बोलताना संयम ठेवणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण मेहनतीचे फळ मिळण्याचे पूर्ण योग आहेत. 
उपाय: या दिवशी काळ्या रंगाची वस्तू दान करणे लाभदायक ठरेल.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांती कधी आहे, 14 की 15 जानेवारी? योग्य तारीख, शुभ मुहूर्त, स्नान-दानाबाबत माहिती जाणून घ्या

(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांती कधी आहे, 14 की 15 जानेवारी? योग्य तारीख, शुभ मुहूर्त, स्नान-दानाबाबत माहिती जाणून घ्या)

2. तूळ रास 

यंदाच्या मकर संक्रांतीला तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत दिसून येत आहेत. शनिदेवांच्या कृपेने धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. कुटुंब आणि सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळू शकते. तसेच मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय शुभ ठरणार आहे. भविष्याबाबत योग्य निर्णय घेता येतील. पण आळशीपणापासून दूर राहणे गरजेचे आहे. 
उपाय: कच्च्या दुधात किंवा गंगाजलात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यास लाभ होईल.

3. कुंभ रास

शनिदेव हे कुंभ राशीचे स्वामी आहेत आणि या राशीसाठी भगवान शिव आराध्य देव मानले जातात. त्यामुळे या मकरसंक्रांतीला कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअर आणि वैयक्तिक जीवनात स्थिरता येईल. शनिदेवांची कृपा लाभेल आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.

Bhogi 2026 Wishes: तुमच्या आयुष्यातील निराशा दूर होवो, भोगी सणानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Bhogi 2026 Wishes: तुमच्या आयुष्यातील निराशा दूर होवो, भोगी सणानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com