जाहिरात

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी का खाल्ली जाते? 99% लोकांना माहीत नाही हे महत्त्वाचं कारण

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात. मकर संक्रांतीपासून ऋतू परिवर्तनालाही सुरुवात होते. या दिवशी काही ठिकाणी खिचडीचे दान करणे आणि खिचडी खाण्याची परंपरा आहे.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी का खाल्ली जाते? 99% लोकांना माहीत नाही हे महत्त्वाचं कारण
"Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी का तयार केली जाते?"
Canva

Happy Makar Sankranti 2026: हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांती सणाला अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यावेळेस मकर संक्रांती सण (Makar Sankranti 2026) साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाला 'उत्तरायण' तर काही ठिकाणी 'खिचडी' असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान, व्रत, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवांची उपासना करण्यास विशेष महत्त्व आहे.

सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मागील एक महिना चाललेला खरमास (Kharmas 2026) समाप्त होतो आणि विवाह, मुंडन, गृहप्रवेश, साखरपुडा यासारख्या मंगल कार्यांना शुभारंभ केला जातो. मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात. मकर संक्रांतीपासून ऋतू परिवर्तन घडू लागते. या दिवसापासून वातावरणातील थंडावाही कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूस शुभांरभ होतो.  

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी का खाल्ली जाते? | Why Is Khichdi Eaten On Makar Sankranti

मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणी खिचडी खाण्यास विशेष महत्त्व आहे. या दिवशी खिचडीचे दान केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात स्थैर्य येते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच स्नान केल्यानंतर खिचडीचे दान करून ती प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आहे.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण

(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण)

मूग डाळीची खिचडी कशी तयार करावी? Moong Dal Khichadi Recipe 

साहित्य:

  • मूग डाळ
  • तांदूळ
  • तूप
  • जीरे
  • हिंग
  • धने पावडर
  • मीठ

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा संपूर्ण यादी

(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा संपूर्ण यादी)

मूग डाळीची खिचडी पाककृती: 
  • खिचडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ आणि मूग डाळ नीट धुवून किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. 
  • थोड्या वेळाने तांदूळ आणि डाळीतील पाणी गाळून घ्या. 
  • एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंगाची फोडणी द्यावी. 
  • जीरे तडतडू लागले की त्यात तांदूळ आणि मूगडाळ मिक्स करून चांगले परतून घ्यावे. 
  • आता भांड्यामध्ये पाणी ओता आणि पाणी पूर्णपणे आटू देऊ नका. 
  • त्यात धने पावडर आणि मीठ मिक्स घालावे.
  • भांड्यावर झाकण ठेवा. 
  • काही वेळ गॅसच्या मध्यम आचेवर सुमारे 10 मिनिटे खिचडी शिजवा. 
  • खिचडी तयार झाल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यावा.

Makar Sankranti 2026 Date: मकरसंक्रांतीला तिळाशी संबंधित हे 7 उपाय केले तर काय होईल? आताच वाचा यादी

(नक्की वाचा: Makar Sankranti 2026 Date: मकरसंक्रांतीला तिळाशी संबंधित हे 7 उपाय केले तर काय होईल? आताच वाचा यादी)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com