जाहिरात

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे? वाचा एका क्लिकवर

Makar Sankranti 2026 Date: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्यास विशेष महत्त्व आहे. या संक्रांतीला कोणते दान केल्याने कल्याण होईल? जाणून घेऊया माहिती

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे? वाचा एका क्लिकवर
"Makar Sankranti 2026 Donation: मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे?"
Canva

Makar Sankranti 2026 Date: सनातन परंपरेत भगवान सूर्य हे असे दैवत आहे, ज्यांचे दर्शन आपल्याला दरदिवशी प्रत्यक्षात मिळते. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना नऊ ग्रहांचा राजा मानले जाते. हिंदू धर्मानुसार लोक सुख, सौभाग्य आणि आरोग्याची देवता म्हणून त्यांची रोज पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते दान करणे अतिशय फलदायी ठरू शकते, याबाबत माहिती जाणून घेऊया...

मकरसंक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे? | Makar Sankranti 2026 Astro Tips

1. मेष रास

मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान-ध्यान करून कोणत्याही मंदिरात जाऊन दीपदान आणि तीळ दान करावे.

2. वृषभ रास

वृषभ राशीचे स्वामी शुक्र देव आहेत. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी उबदार कपडे, तीळ आणि शुद्ध तुपाचे विशेष स्वरुपात दान करावे.

3. मिथुन रास

बुध ग्रहाशी संबंधित असणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान-ध्यानानंतर मूग डाळीची खिचडी, हिरव्या रंगाचे कपडे आणि हिरव्या रंगाच्या फळांचे दान करावे.

4. कर्क रास

कर्क राशीचे स्वामी चंद्रदेव आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपल्या क्षमतेनुसार तांदूळ, साबुदाणा, पांढरे तीळ आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे.

5. सिंह रास

सिंह राशीचे स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत आणि त्याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी तीळ आणि उबदार कपड्यांचे दान करावे.

6. कन्या रास

कन्या राशीचे स्वामी बुध ग्रह आहेत. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी उडदाची डाळ, तांदूळ, खिचडी, तीळ आणि उबदार कपड्यांचे दान करावे.

Makar Sankranti 2026 Date: मकरसंक्रांतीला तिळाशी संबंधित हे 7 उपाय केले तर काय होईल? आताच वाचा यादी

(नक्की वाचा: Makar Sankranti 2026 Date: मकरसंक्रांतीला तिळाशी संबंधित हे 7 उपाय केले तर काय होईल? आताच वाचा यादी)

7. तुळ रास

तुळ राशीचे स्वामी शुक्र आहेत. या राशीच्या लोकांनी पुण्यप्राप्तीसाठी तिळाचे तेल, कापूस, पांढऱ्या रंगाचे कपडे तसेच आपल्या क्षमतेनुसार अन्न तसेच धनाचे दान करावे.

8. वृश्चिक रास

वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ देव आहेत. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करून गरजूंना खिचडी, घोंगडी आणि गूळ दान करावा.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण

(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण)

9. धनु रास

धनु राशीचे स्वामी गुरू ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि हरभरा डाळीचे दान करावे.

10. मकर रास

मकर राशीचे स्वामी शनी देव आहेत आणि याच राशीत सूर्यदेवांचा प्रवेश होतो. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी तेल, तीळ आणि घोंगडी दान करावे. शक्य असल्यास गरजूंना खिचडी शिजवून खायला द्यावी.

11. कुंभ रास

कुंभ राशीचे स्वामी देखील शनी देव आहेत. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, वस्त्र आणि अन्नदान करावे.

12. मीन रास

मीन राशीचे स्वामी गुरू ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, हरभरा, उबदार कपडे आणि पूजेचे साहित्य दान करावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com