Makar Sankranti 2026 Date: सनातन परंपरेनुसार दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2026) उत्सव साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्य धनु राशीतून शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी स्नान, ध्यान आणि दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी सूर्यकिरणांच्या पुण्यप्रभावामुळे व्यक्तीला संपूर्ण वर्षभर सुख, सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त होते. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यप्राप्ती होण्यासाठी कोणती 7 कामे नक्की करावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1. तिळाच्या तेलाने मसाज करावा
हिंदू मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळाच्या तेलाने मसाज केल्यास सूर्यदेवांची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे. सूर्यदेवांच्या आशीर्वादाने व्यक्ती संपूर्ण वर्षभर निरोगी राहतो, असेही म्हणतात.
2. तिळाचे उटणे
मकरसंक्रांतीच्या दिवशी चांगले नशीब प्राप्त होण्यासाठी केवळ तिळाचे तेलच नव्हे तर तिळाचं उटणंही शरीरावर लावावं, अशी मान्यता आहे.
3. गंगा स्नानमकरसंक्रांतीच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा नदीमध्ये तीन डुबक्या घेतल्यास अनंत पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करणं शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करू शकता.
4. तीळमिश्रित पाण्याने स्नान करावेजर तिळाच्या तेलाने मसाज करणे किंवा तिळाचं उटणं लावणे शक्य नसेल तर किमान स्नानाच्या पाण्यात तीळ मिक्स करावे त्या पाण्याने स्नान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळमिश्रित पाण्याने स्नान केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
5. पूजेमध्ये तिळाचं हवन करावेमकर संक्रांतीच्या दिवशी स्नान-ध्यानानंतर हवन केल्यास विशेष फल प्राप्ती होते, असे म्हणतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी देवतांसाठी केले जाणाऱ्या हवन सामग्रीत तिळाचा समावेश केल्यास साधना-आराधनेचे पुण्य अधिक वाढते. या दिवशी तिळाने हवन केल्यास लक्ष्मीमाता आणि भगवान नारायण दोघांची कृपा लाभते, असे म्हणतात.
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण)
6. गरजूंना तीळ दान करामकर संक्रांतीच्या दिवशी स्नानासोबत दानालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी काळे तिळ आणि गूळ यांचे दान केल्यास भगवान सूर्य तसेच शनिदेवांची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
7. तिळाचा समावेश असलेले भोजन
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून तयार केलेले भोजन देखील शुभ फळ देते, असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी तिळाचे लाडू, चिक्की इत्यादी पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. प्रसादरूपाने तिळापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास सूर्यदेवांची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे.
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांती कधी आहे, 14 की 15 जानेवारी? योग्य तारीख, शुभ मुहूर्त, स्नान-दानाबाबत माहिती जाणून घ्या)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

