जाहिरात

Margashirsha Purnima 2025: मार्गशीर्ष पौर्णिमेचे महाउपाय, लक्ष्मीमाता आणि भगवान विष्णूंचा मिळेल मोठा आशीर्वाद

Margashirsha Purnima 2025: हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. कोणते उपाय केल्यास लाभ मिळतील? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Margashirsha Purnima 2025: मार्गशीर्ष पौर्णिमेचे महाउपाय, लक्ष्मीमाता आणि भगवान विष्णूंचा मिळेल मोठा आशीर्वाद
"Margashirsha Purnima 2025: मार्गशीर्ष पौर्णिमेचे महाउपाय"
Canva

Margashirsha Purnima 2025: मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि चंद्र देवतेची विशेष स्वरुपात पूजा करण्याचे अतिशय महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी मनाला शांतता मिळावी, यासाठी हा दिवस फलदायी मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केल्यास लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळेल? याबाबत माहिती जाणून घेऊया... 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय | Margashirsha Purnima 2025 Remedies

गंगास्नान केल्यास दूर होतील सर्व दोष

सनातन परंपरेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान किंवा एखाद्या पवित्र जलस्त्रोतामध्ये स्नान करणं अतिशय शुभ तसेच फलदायी मानले जाते. पुण्यप्राप्ती आणि पापमुक्तीसाठी या दिवशी गंगा स्नान करण्याचा प्रयत्न करावा. गंगाघाटावर किंवा एखाद्या जलस्त्रोताच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करावे. 

भगवान विष्णूची पूजा | Bhagwan Vishnu Puja 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणं अतिशय महत्त्वाचे मानले जाते. कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. काही कारणास्तव तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात श्री विष्णूंची पूजा करण्याचे भाग्य लाभले नसेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेला पूजा करा, जेणेकरून संपूर्ण महिन्याचे पूजा केल्याचे पुण्यफळ मिळू शकते.

श्री विष्णू सहस्त्रनाम 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भाविकांनी या दिवशी विधीवत व्रत करावे, या दिवशी विशेष पूजा अर्चना करावी. सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. 

मन आणि इच्छांशी संबंधित चंद्रदेव

हिंदू मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मनाचे कारक मानल्या जाणाऱ्या चंद्रदेवांची विशेष स्वरुपात पूजा करावी आणि दर्शनही घ्यावी. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्यास मन शांत राहण्यास मदत मिळेल.  

चंद्र देवतेला खास नैवेद्य

पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवतेची कृपा मिळवण्यासाठी चंद्रोदयाच्या वेळेस एका पात्रामध्ये स्वच्छ पाणी, फुलं आणि थोडेसे दूध घेऊन विशेष अर्घ्य करावे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवतेची कृपा व्हावी, यासाठी त्यांना खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावी. 

Margashirsha Purnima 2025: मार्गशीर्ष पौर्णिमेला 'ही' 10 कामे अजिबात करू नका, पुण्याऐवजी पदरी पडेल पाप

(नक्की वाचा: Margashirsha Purnima 2025: मार्गशीर्ष पौर्णिमेला 'ही' 10 कामे अजिबात करू नका, पुण्याऐवजी पदरी पडेल पाप)

लक्ष्मीमातेची पूजा  

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीमातेची आवर्जून पूजा करावी. धनाच्या देवीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मीमातेला कमळाचे फुल, पिवळ्या रंगाच्या कवड्या, कमळाचे बीज आणि गोमती चक्र अर्पण करावे. यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करून श्रीसूक्ताचे पठण करावे.

Datta Jayanti 2025 Wishes : त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळो! दत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा

(नक्की वाचा: Datta Jayanti 2025 Wishes : त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळो! दत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा)

मंत्रांचा करा जप

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा तिथीला भगवान विष्णूंची पूजा करताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'ॐ नमो नारायण' या मंत्रांचा विशेष स्वरुपात जप करावा. तुळशी माळ किंवा चंदनाच्या माळेनं जप केल्यास श्री विष्णूंची कृपा होते, असे म्हणतात.  

Datta Jayanti 2025 Shubh Muhurat: दत्त जयंतीची तारीख, पूजा, तिथी, शुभ मुहूर्त आणि उपवासाची महत्त्वाची माहिती

(नक्की वाचा: Datta Jayanti 2025 Shubh Muhurat: दत्त जयंतीची तारीख, पूजा, तिथी, शुभ मुहूर्त आणि उपवासाची महत्त्वाची माहिती)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com