Meditation Benefits: तणावमुक्त जीवनाचे गुपित! सलग 21 दिवस मेडिटेशन करा अन् ताण,राग, चिडचिड विसरा

Meditation Benefits: तुम्हीही कामाच्या ताणाने त्रस्त आहात का? 21 दिवसांच्या मेडिटेशनमुळे कसे आयुष्य बदलता येते? तणाव, निद्रानाश आणि अँक्झायटीवर मात करण्यासाठी जाणून घ्या खास उपाय....

जाहिरात
Read Time: 2 mins
"Meditation Benefits: मेडिटेशन करण्याचे फायदे"

Meditation Benefits: 35 वर्षांच्या आयेशाने अलीकडेच तिचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. ती म्हणाली, "दैनंदिन कामाच्या दबावामुळे मी दररोज खूप तणावात असायचे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग आणि चिडचिड व्हायची. कामाच्या व्यापात मी माझ्या खाण्यापिण्याकडे आणि व्यायामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे. रात्री नीट झोपही येत नसे. माझी अस्वस्थता (Anxiety) वाढत होती आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या दबावामुळे मला भीती वाटू लागली होती की मी डिप्रेशनमध्ये जाईन की काय?"

"मग माझ्या एका सहकाऱ्याने मला रोज मेडिटेशन (ध्यान) करण्याचा सल्ला दिला, जो माझ्या आयुष्यासाठी एक 'गेम-चेंजर' ठरला. मी सलग 21 दिवस मेडिटेशन केले आणि आता मी स्वतःमध्ये पूर्णपणे बदल अनुभवत आहे. ताण, राग, अस्वस्थता सर्व गोष्टी कमी झाल्या आहेत. माझ्या या अनुभवातून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता."

21 दिवस मेडिटेशन करण्याचे फायदे (The Benefits of Meditating for 21 Days)
1. तणाव कमी होईल

मेडिटेशन तणाव कमी करण्यास आणि या समस्येशी संबंधित त्रास जसे की इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), PTSD आणि फायब्रोमायल्जिया  या गोष्टींचा त्रास कमी करण्यास मदत मिळू शकते.  

Advertisement

2. स्मरणशक्ती सुधारेल 

नियमित ध्यानामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक स्पष्टता येते, ज्यामुळे वयानुसार होणारी स्मरणशक्तीवर होणारे परिणाम कमी होऊ शकतात. 

3. एकाग्रतेत वाढ होईल

मेडिटेशनमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ कामात मग्न राहू शकता.

4. उत्तम झोप

ध्यान केल्याने चांगली झोप मिळण्यात मदत होते. नियमित ध्यान केल्यास झोपेशी संबंधित समस्या दूर होतील. 

5. वेदना कमी होण्यास मदत

मेडिटेशन वेदना सहन करण्याची क्षमता वाढवते आणि भावनिक नियंत्रण सुधारते.

(नक्की वाचा: Summer Cooling Tips: उकाड्याने हैराण झाले आहात? 5 रुपयांच्या खर्चात कुलरला बनवा AC! जाणून घ्या जबरदस्त ट्रिक)

6. ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा

नियमित ध्यानामुळे रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होण्यास मदत मिळेल. 

7. अस्वस्थता आणि डिप्रेशन

नियमित मेडिटेशन केल्यास अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते. एकूणच सोशल अँक्झायटी, भीती आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यास ध्यान अत्यंत प्रभावी उपाय आहे.

Photo Credit: NDTV Marathi

FAQs
Q1. सलग 21 दिवस मेडिटेशन केल्याने  खरंच फरक पडतो का? 

हो, नियमित ध्यान केल्यास मानसिक संतुलन, झोप आणि एकाग्रतेमध्ये बदल अनुभवू शकता. 

Q2. दिवसभरात किती मिनिटे मेडिटेशन करावे?
सुरुवातीस 10–15 मिनिटे मेडिटेशन केले जाऊ शकते. 

Q3. मेडिटेशनमुळे राग आणि अस्वस्थता कमी होऊ शकते का?
नियमित ध्यान केल्यास भावनिक संतुलन सुधारते. 

(नक्की वाचा: Bathroom Smell Removal: बाथरूममधील कुबट वासाने हैराण झाले आहात? या 3 स्वस्त आणि मस्त ट्रिक्स वापरून पाहाच)

Advertisement

Q4. मेडिटेशनमुळे झोपेशी संबंधित समस्या दूर होईल? 
हो, मेडिटेशनमुळे कित्येक लोकांना गाढ झोप येते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )