जाहिरात

Summer Cooling Tips: उकाड्याने हैराण झाले आहात? 5 रुपयांच्या खर्चात कुलरला बनवा AC! जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

Summer Cooler Tips: उन्हाळ्यात कुलरमधून AC सारखी थंड हवा हवी आहे का? 5 रुपयांत कुलरची कुलिंग वाढवण्याचे सोपे घरगुती उपाय आणि टिप्स जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Summer Cooling Tips: उकाड्याने हैराण झाले आहात? 5 रुपयांच्या खर्चात कुलरला बनवा AC! जाणून घ्या जबरदस्त ट्रिक
"Summer Cooler Tips: कुलरमधून ACसारखी थंडगार हवा कशी मिळवावी?"
NDTV Marathi

Summer Cooler Tips: जसजसे तापमानाचा पारा चढत आहे, तसतसे घर थंड ठेवण्यासाठी AC किंवा कुलरचा वापर वाढू लागला आहे. बहुतांश लोकांच्या घरी ACची व्यवस्था असते, पण ज्यांना ACचा खर्च परवडू शकत नाही, ती मंडळी कुलरचा पर्याय स्वीकारतात. तुमच्याही घरामध्ये कुलर आहे का? तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कधीकधी कुलरमधून थंड हवा येत नाही, तुम्ही देखील या समस्येचा सामना करत आहात का? चिंता करू नका, केवळ 5 रुपयांमध्ये तुम्हाला कुलरमधून एसीसारखी थंडगार हवा मिळेल. जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

कुलरमधून थंड हवा येत नसेल तर काय करावे? कुलरचे कुलिंग वाढवण्यासाठी देसी जुगाड

1. बर्फ आणि मिठाचा वापर

जर तुम्हाला कुलरचे पाणी दीर्घकाळासाठी थंड ठेवायचे असेल तर तुमच्या किचनमधील एक साधी गोष्ट वापरा. मिठामुळे बर्फ लवकर वितळत नाही, त्यामुळे कुलरच्या टाकीत बर्फाचा मोठा खडा टाका आणि त्यात तीन ते चार मूठभर मीठ मिसळा. यामुळे पाणी बराच वेळ थंड राहील आणि कुलरमधून थंडगार हवा येईल.

(नक्की वाचा: Summer Health Tips: उन्हाळ्यात सतत तोंड कोरडं पडतंय? शरीराचा हा 'वॉर्निंग सिग्नल' वेळीच ओळखा, अन्यथा...)

2. कुलिंग पॅड्सची स्वच्छता 

कुलर गरम हवा देत असेल तर त्याचे मुख्य कारण म्हणजे 'कुलिंग पॅड्स' घाणेरडे असणे. जर कुलर सुरू करूनही थंड हवा येत नसेल, तर दर 15 ते 20 दिवसांनी हे पॅड्स स्वच्छ धुवा. ते खराब झाले असतील तर बदलून घ्या. पॅडवर पातळ सुती कापडाचा किंवा तागाच्या (Jute) कापडाचा थर लावल्यास कुलिंग अधिक चांगली होते.

(नक्की वाचा: Better Sleep Tips: शांत गाढ झोप हवीय? झोपताना बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? वाचा तज्ज्ञांचा सल्ला)

महत्त्वाच्या टिप्स

  • कुलर थेट उन्हात न ठेवता सावलीत ठेवा.
  • जुने झालेले कूलिंग पॅड्स बदला.
  • कुलर पूर्णपणे बंद खोलीत वापरू नका, हवा खेळती (Cross-ventilation) राहू द्या.

FAQs
1. कुलरमधून थंड हवा न येण्यामागील कारण 

उत्तर: घाणेरडे कुलिंग पॅड, गरम पाणी आणि योग्य व्हेंटिलेशन होत नसल्याने कुलरमधून थंड हवा बाहेर येत नाही. 

2. मीठ आणि बर्फामुळे कुलरमधून जास्त थंड हवा येईल का?
उत्तर: मिठामुळे बर्फ लवकर विरघळत नाही, ज्यामुळे कुलरमधील पाणी दीर्घकाळासाठी थंड राहू शकते. 

3. कुलरमधून थंडगार हवा येण्यासाठी काय करावे?
उत्तर: कुलर मोकळ्या ठिकाणी ठेवा, कुलिंग पॅड्स स्वच्छ ठेवा आणि खोलीमध्ये क्रॉस व्हेंटिलेशन असावे. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com