जाहिरात

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी,गुडघेदुखी वाढलीय? पेनकिलरऐवजी प्या 'हा' चहा, रीसर्चमधील मोठी माहिती समोर

Joint Pain In Monsoon: पावसाळ्यात वाढणारी सांधेदुखी आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी हळदीचा चहा कसा फायदेशीर ठरतो, संशोधनात काय समोर आले आहे आणि हा चहा कसा तयार करावा? याबाबत सविस्तर माहिती.

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी,गुडघेदुखी वाढलीय? पेनकिलरऐवजी प्या 'हा' चहा, रीसर्चमधील मोठी माहिती समोर
"Joint Pain In Monsoon: पावसाळ्यात गुडघेदुखीपासून कसा आराम मिळवावा?"
Canva

Joint Pain In Monsoon: पावसाळा सुरू होताच अनेकांना सांधे आणि गुडघेदुखीची तक्रार सुरू होते. विशेषतः गुडघ्यात दुखणे आणि ताठरपणा जाणवणे, या पावसाळ्यातील सामान्य समस्या आहेत. पावसाळ्यात लोकांच्या चालण्याफिरण्यासह शारीरिक हालचाली देखील कमी होतात, यामुळेही शरीराचे दुखणे वाढू शकते. सांधेदुखीचा त्रास कायम राहिला तर दैनंदिन जीवनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. चालण्या-फिरण्यात, जिने चढण्यात आणि इतर महत्त्वाच्या कामांमध्येही अडथळा येऊ शकतो.

तुम्हीही पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीने त्रस्त असाल तर हळदीचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 'बीएमसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन अँड थेरपीज'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनातील माहितीनुसार ऑस्टियोआर्थरायटिसने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये हळद वेदना कमी करण्यास मदत करू शकते. हळदीमध्ये आढळणारा 'कर्क्युमिन' नावाचा घटक सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो.

हळदीचा चहा फायदेशीर का ठरतो?

हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनमध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. जेव्हा शरीरातील सूज कमी होते, तेव्हा सांधेदुखी सुद्धा कमी जाणवू शकते. यामुळेच हळदीचा फार पूर्वीपासून घरगुती उपचारांमध्ये वापर केला जातो. याशिवाय हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराला आतील बाजूने मजबूत ठेवण्यास मदत करतात. हे सांध्यांमध्ये होणारी सूज आणि ताण कमी करून आराम देऊ शकते.

(नक्की वाचा : Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर या 7 गोष्टींपासून राहा दूर, डॉ मिगलानींनी दिला 'हा' इशारा)

संशोधन काय सांगते?

'करंट रूमेटोलॉजी रिपोर्ट्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातील माहितीनुसार, सांध्यांमध्ये सतत राहणारी हलकी सूज कमी करण्यास हळद मदत करू शकते. कच्ची हळद किंवा हळदीचा अर्क गुडघेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे.

काही अभ्यासांमध्ये हे देखील समोर आले आहे की, हळद केवळ वेदना कमी करत नाही तर लोकांच्या चालण्या-फिरण्याच्या क्षमतेतही सुधारणा करू शकते. पण सामान्य वेदनाशामक औषधांच्या तुलनेत हळदीचे दुष्परिणाम कमी दिसून आले आहेत.

(नक्की वाचा : Chili Burn Remedies: मिरची खाल्ल्यानंतर पाणी पिणे पडेल भारी! जळजळ अधिक का वाढते? तज्ज्ञांनी सांगितलं मोठे कारण)

हळदीचा चहा कसा तयार करावा?
साहित्य:

  • पाणी (1 कप)
  • हळद पावडर किंवा किसलेली कच्ची हळद (अर्धा ते 1 चमचा)
  • आले, दालचिनी किंवा काळी मिरी (पर्यायी)
  • मध (चवीनुसार)

हळदीचा चहा तयार करण्याची पद्धत 

  • एक कप पाणी उकळा
  • त्यात हळद घालून 5 ते 7 मिनिटे शिजू द्यावी.
  • हवे असल्यास त्यामध्ये आले, दालचिनी किंवा काळी मिरीही मिक्स करू शकता. 
  • शेवटी चवीसाठी थोडे मध मिक्स करू शकता. 

काळी मिरी का वापरावी? 

तज्ज्ञांच्या मते हळदीसोबत थोडीशी काळी मिरी घातल्यास शरीर हळदीतील कर्क्युमिन घटक अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते. काळ्या मिरीमध्ये असलेले 'पायपेरिन' नावाचे तत्त्व हळदीचे गुणधर्म शरीरापर्यंत पोहोचवण्यास मदत करते.
  
हळदीचा चहा कोणासाठी ठरू शकतो फायदेशीर? 

  • वाढत्या वयामुळे सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवणारे लोक.
  • ऑस्टियोआर्थरायटिसचे रुग्ण.
  • जास्त वेळ खुर्चीवर बसून काम करणारे लोक.
  • हवामान बदलताच सांधेदुखीचा अनुभव घेणारे लोक.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com