जाहिरात

Happy Mother’s Day 2025 wishes: आईचे प्रेम समुद्रासारखे अथांग, मातृदिनानिमित्त पाठवा या प्रेमळ शुभेच्छा

Happy Mother’s Day 2025 Wishes And Status: प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची आई म्हणजे संपूर्ण जग असते. आईच्या त्याग आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी मातृदिन साजरा केला जातो. हे खास संदेश पाठवून मदर्स डे अधिक खास बनवा.

Happy Mother’s Day 2025 wishes: आईचे प्रेम समुद्रासारखे अथांग, मातृदिनानिमित्त पाठवा या प्रेमळ शुभेच्छा
"Mother’s Day 2025 : मदर्स डेच्या शुभेच्छा | मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

Happy Mother's Day 2025 Wishes In Marathi: आईच्या प्रेमाची तुलना कोणत्याही गोष्टीशी केली जाऊ शकत नाही. आईचा कोणताही एक दिवस असू शकत नाही कारण सर्वच दिवस हे आईचे आणि आईमुळेच असतात. पण दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (Mother's Day 2025) साजरा केला जातो. प्रत्येक आईप्रति आदर, कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्यासाठी मडर्स डे (Mother's Day 2025 Wishes) साजरा केला जातो. प्रत्येक नात्यामध्ये कधी-न्-कधी स्वार्थ दिसून येतो पण आईचे प्रेम हे निस्वार्थ असते. आईची ममता शब्दात मांडणे सोपे नसते किंवा शक्यही नसते. लेकराच्या मनामध्ये काय सुरू आहे हे आईला न सांगताही समजते, म्हणूनच आई ही देवासमान असते.

मातृदिनानिमित्त तुमच्या आईसाठी हृदयस्पर्थी शुभेच्छा नक्की पाठवा आणि तुमच्या मनातील भावनाही व्यक्त करा.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मदर्स डेच्या शुभेच्छा | मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mother's Day 2025 Wishes And Status

1. आईच्या आशीर्वादामुळे आयुष्य बदलतं
स्वतः रडेल पण तुम्हाला हसवेल 
कधी चुकूनही आईला रडवू नका 
कायम तिला ठेवा खूश 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. आईचे हृदय सर्वात कोमल असते
ज्यामध्ये केवळ प्रेमच प्रेम असते
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. तू जेथेही राहशील आई
प्रार्थनेमध्ये कायम माझे नाव घेत राहशील
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. आई तुझ्याविना प्रत्येक सुख अपूर्ण आहे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. तिच्या ओठांवर कधीही वाईट शब्द नसतो
आई कधीही आपल्यावर रागवत नाही
मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day 2025: मदर्स डे कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि अशी करा मातृदिनाची तयारी

(नक्की वाचा: Mothers Day 2025: मदर्स डे कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि अशी करा मातृदिनाची तयारी)

6. प्रत्येक नात्यामध्ये काही-न्-काही कमतरता पाहिलीय
कच्च्या रंगांची सजावट पाहिलीय 
वर्षानुवर्षे मी माझ्या आईला पाहतेय
तिच्या चेहऱ्यावर कधीही दिसला नाही थकवा  
ना तिच्या प्रेमात कोणतीही कमतरता
मातृदिनाच्या शुभेच्छा!

7. आई तुझे हृदय समुद्रापेक्षा खोल आहे 
माझ्या प्रत्येक प्रार्थनेत तुझे नाव सर्वात आधी येते 
मातृदिनाच्या शुभेच्छा!

8. प्रत्येक जन्मात तुझ्यासारखी आई मिळो
तुझ्याविना माझी प्रत्येक इच्छा अपूर्ण वाटते
Happy Mothers Day 2025

9. तू हसतेस तेव्हा प्रत्येक दुःख छोटे वाटते
आई तुझ्या आशीर्वादामुळे सर्व संकटं दूर होतात 
Happy Mothers Day!

10. आयुष्यातील पहिला गुरू आई असते 
आयुष्यातील पहिली मैत्रीण देखील आई असते
आयुष्य देखील आई असते कारण
आयुष्य देणारीही आईच असते 
Happy Mothers Day 2025 Message 

11. आईसारखे प्रेम जगात कुठेही मिळू शकत नाही
आईच्या प्रेमात जितका गोडवा आणि आपुलकी असते
आईच्या प्रेमापेक्षा मौल्यवान काहीही नसते
Happy Mothers Day 2025 

12. दिवसभराचे काम करून 
आई थकून झोपून जाते
डोळे बंद असले तरीही मनात फक्त
लेकराची काळजी असते
Wishes For Mothers Day 2025

13. तूच माझी सर्वात चांगली मैत्रीण
माझी गुरू आणि माझी रक्षक आहेस
म्हणून आई तू कायम माझ्या हृदयामध्ये असते 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Emotional Line For Mother Day 2025

14. माझ्या छोट्या छोट्या आनंदासाठी 
तू कित्येक त्याग केले आहेस
मला कोणत्याही वेदना झाल्या तरी 
सर्वप्रथम मी तुझे नाव घेतलंय
Happy Mother's Day 2025

15. मी खूप लोकांना भटकताना पाहिलंय 
पण जेव्हा आईने त्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय
त्याच लोकांना खूप मोठी उंची गाठताना पाहिलंय 
मातृदिनाच्या शुभेच्छा!

16. आईच्या हातातून कायम आशीर्वादच मिळणार
आईच्या पायाशी खरे स्वर्ग असते
कोण म्हणते की मला स्वर्ग सापडला नाही?
आईच्या मांडीवर एकदा डोके ठेवून तर पाहा 
मातृदिनाच्या शुभेच्छा!

17. आईसारखे प्रेम आणि माया कुठेच मिळणार नाही
आई तुझ्या साडीचा पदरच माझ्यासाठी आभाळ आहे

18. तू देवापेक्षा कमी नाहीस 
आई,तू माझे संपूर्ण जग आहेस
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

19. आई हा फक्त एक शब्द नाहीय
तर भावनांचा महासागर आहे 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

20. आई, तू माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेस
तुझे प्रेम ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे
मातृदिनाच्या शुभेच्छा!
Happy Mother's Day 2025

Listen to the latest songs, only on JioSaavn.com