जाहिरात

Mothers Day 2025: मदर्स डे कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि अशी करा मातृदिनाची तयारी

Mothers Day 2025: मडर्स डेला आईवरील तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि तिला थँक यू म्हणण्यासाठी जाणून घ्या एकापेक्षा एक भारी टिप्स...

Mothers Day 2025: मदर्स डे कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि अशी करा मातृदिनाची तयारी
Mothers Day 2025: मदर्स डे कधी साजरा केला जाणार?

Mothers Day Celebration and Gifts: आई ही आपली पहिली गुरू असते. मायलेकाचे किंवा मायलेकीचे नाते सर्व नात्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. आईशी तिच्या बाळाशी जन्मापासून मायेची नाळ जोडलेली असते. आपल्या मुलांना घडवण्यासाठी प्रत्येक आई स्वतःची स्वप्न दूर सारुन आपले जीवन पूर्णपणे बाळाला समर्पित करते. तसे पाहायला गेले तर आईचा ठराविक एक दिवस असू शकत नाही, पण आईप्रति आपले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी जगभरात मे महिन्यात 'मडर्स दे' म्हणजेच 'मातृदिन' (Mothers Day Importance) साजरा केला जातो. यंदा मातृदिन  (When is Mother's Day) कधी साजरा केला जाणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया...   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मदर्स डे कधी आहे? (When is Mothers Day in 2025)

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा 11 मे रोजी जगभरात मातृदिन साजरा केला जाणार आहे. मदर्स डेची सुरुवात अमेरिकेच्या अ‍ॅना जार्विस यांनी केली होती. अ‍ॅना यांचा त्यांच्या आईवर खूप जीव होता. अ‍ॅना यांनी आईप्रति आदर व्यक्त करण्यासाठी 1907 साली एका सभेचे आयोजन केले होते. यानंतर अ‍ॅना यांनी हा दिवस प्रत्येक आईसाठी समर्पित करण्याची मागणी केली. काही वर्षांनंतर 1914मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा करता यावा म्हणून तो दिवस राष्ट्रीय सुटी म्हणून घोषित केला. यानंतर इतर देशांनीही हा दिवस मातांना समर्पित करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे मागील काही वर्षांपासून मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन साजरा केला जात आहे. 

मातृदिनाची अशी करा तयारी (How to Prepare for Mothers Day)

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीसाठी आई अतिशय महत्त्वाची असते. या दिवशी लोक त्यांच्या आईला भेटवस्तू देऊन किंवा एखादी खास गोष्ट करुन तिचे आभार मानतात आणि प्रेमही व्यक्त करतात. तुम्ही देखील 'मडर्स डे'निमित्त आईसाठी खास प्लान आखू शकता. जाणून घेऊया काही खास आयडिया...

मातृदिनानिमित्त आईला विश्रांती द्या

तुमची आई दिवसभर घरातील सर्व काम करुन थकत असेल तर मातृदिनासह अन्य दिवशीही तिला थोडीशी विश्रांती द्यावी. आईकडील काही कामांची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी. विशेष म्हणजे मातृदिनाला आईला पूर्णपणे आराम करू द्यावा. 

आईला पत्र लिहा

आईने तुमचा हात पकडून तुम्हाला लिहायला शिकवले. मडर्स डेचे तिला खास गिफ्ट द्यायचे असेल तर स्वतःच्या हाताने पत्र लिहून तिचे आभार व्यक्त करा. ज्या भावना तुम्ही व्यक्त करू शकत नाहीय त्या पत्राद्वारे तिच्यापर्यंत पोहोचवा. 

आईला फिरायला घेऊन जा

आईला तिच्या आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. आईसोबत पिकनिकचा प्लान आखू शकता. बाहेरगावी जाणे शक्य नसेल तर तुम्ही राहत असलेल्याच ठिकाणी आईसोबत फिरायला जाऊ शकता. एखाद्या मंदिर किंवा बागेतही तुम्ही जाऊ शकता. 

हेल्थ चेकअप

मदर्स डेनिमित्त आईसाठी हेल्थ चेकअपचीही प्रक्रिया तुम्ही करू शकता. आईला हेल्थ चेकअप किंवा वेलनेस पॅकेज गिफ्ट करावे. तिच्यासाठी फिटनेस ट्रॅकर किंवा स्मार्ट वॉच देखील गिफ्ट म्हणून घेऊ शकता.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com