Voter Ink : मतदानाच्या वेळी Index Finger वरच का लावली जाते शाई? मतदाराला दोन हात नसल्यास मतदान करता येतं का?

जर एखाद्या मतदाराला हातच नसतील, तर अशा व्यक्तीला कुठे शाई लावली जाते? याबाबत तुम्हाला माहित नसेल, तर जाणून घ्या सविस्तर माहिती..

जाहिरात
Read Time: 3 mins
Voting Ink Facts And All Details
मुंबई:

Election Voting Ink GK News : राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबईसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या आहेत. दिग्गज सेलिब्रिटीही आपल्या कुटुंबासह मतदान करत असल्याचं पाहायला मिळत आहे.अशातच या निवडणुकीत मार्करने शाई लावली जात असून काही वेळानंतर शाई पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विरोधकांनी मार्करच्या शाईचा मुद्दा उपस्थित करत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केले आहेत.

पण जेव्हा तुम्ही कोणत्याही पोलिंग बुथवर मतदान करायला जाता, तेव्हा मतदाराच्या बोटावर शाई लावण्यात येते, याबाबत तुम्हाला माहितच असेल. मतदाराने मतदान केलं आहे, हे या शाईमुळे निश्चित होतं. तसच ज्याच्या बोटावर शाई लावली आहे, तो पुन्हा मतदान करू शकत नाही. ही शाई मतदाराच्या डाव्या हातावरील तर्जनी (पहिल्या) बोटावर लावली जाते. जर एखाद्या मतदाराला हातच नसतील, तर अशा व्यक्तीला कुठे शाई लावली जाते? याबाबत तुम्हाला माहित नसेल, तर जाणून घ्या सविस्तर माहिती..

हाताच्या कोणत्या बोटावर शाई लावली जाते?

जे लोक मतदान करतात त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतात. त्यानुसार, मतदान करणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या तर्जनी (पहिल्या)बोटावर शाई लावली जाते. ब्रशने नखाच्या वरून पहिल्या सांध्यापर्यंत ही अमिट शाई मतदाराच्या बोटावर लावली जाते.

बोटावर शाई का लावली जाते?

कोणत्याही मतदाराने पुन्हा मतदान करू नये आणि मतदानाच्या आकडेवारीत फसवणूक होऊ नये, यासाठी मतदान करणाऱ्या मतदाराच्या तर्जनी बोटावर शाई लावली जाते.ही शाई सहजपणे पुसता येत नाही.मतदाराच्या बोटावर ही शाई किमान एक आठवडा तशीच राहते आणि हळूहळू निघते.

Advertisement

नक्की वाचा >> BMC Election 2026: मुंबईत हिंदू-मुस्लिमांची लोकसंख्या किती? 30 टक्के मराठी मतदान कोणाच्या पारड्यात? जाणून घ्या

डाव्या हाताच्या तर्जनी बोटावरच का लावली जाते शाई?

मतदानाच्या वेळी उजव्या हाताच्या कोणत्याही बोटावर शाई लावली जात नाही. कारण आपण जेवताना बहुतेक वेळा उजव्या हाताचा वापर करतो. त्यामुळे शाईतील रसायनांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.म्हणूनच डाव्या हाताच्या तर्जनी बोटावरच मतदानाची शाई लावली जाते.

ज्यांना बोट नाहीत त्यांना निळी शाई कुठे लावली जाते?

जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या हाताचा तर्जनी बोट नसेल,तर अशा परिस्थितीत त्याच्या डाव्या हाताच्या कोणत्याही बोटावर शाई लावली जाऊ शकते. पण जर डाव्या हातावर एकही बोट नसेल,तर मग उजव्या हाताच्या तर्जनी बोटावर निळी शाई लावली जाते,ज्यामुळे हे ओळखता येते की त्या व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Viral Video : शाळेतील मुलांच्या डब्यात मॅगी अन् चिप्स..व्हिडीओ पाहताच लोक पालकांवर भडकले, "फक्त आईलाच दोष.."

जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हातच नसतील तर काय होते?

एखादा व्यक्ती मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला असेल, पण त्याला दोन हातच नसतील,तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यावर निवडणुकीची शाई लावली जाते. यामुळे हे स्पष्ट होतं की, त्या व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला आहे.