School Students Tifin Box Video Viral : दिवसेंदिवस माणसांची जीवनशैली इतकी बदलत आहे की,अनेकांना खाण्यापिण्याच्या वाईट सवयीच लागल्या आहेत.विशेषत: लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांना टिफीन बॉक्समध्ये फास्ट फूड देतात.याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मुलांचे डबे दाखवले गेले आहेत,ज्यात चिप्स,मॅगीसारखं जंक फूड असल्याचं दिसतंय.हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेच आहे आजकालचं पालकत्व?असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे.
पालक मुलांना पौष्टिक डबे देतात का? व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
शाळेच्या डब्यात असलेले जे अन्नपदार्थ मुलं खातात, तो त्यांच्या दिवसभराच्या आहाराचा मोठा भाग असतो. पण पालक मुलांना पौष्टिक डबे देतात का?, याचं उत्तर 'नाही' असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही.कारण मुलांना फास्ट फूड असलेले डबेच आवडतात, असा खुलासाच या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, शिक्षिका मुलांचे डबे दाखवत आहेत.त्यावेळी बहुतेक मुलं नूडल्स आणि चिप्स खाताना दिसतात,तर एकच मुलगा पोळी-भाजी खात असल्याचं या व्हिडीओत दिसतं.
नक्की वाचा >> संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन! 10 एकरमध्ये उभारलं आई-वडिलांचं स्मारक! 4 भावंडांची स्टोरी वाचून अभिमान वाटेल
"आजचा सर्वात दुःखद व्हिडिओ"
Saddest video I have seen this week
— Vineeth K (@DealsDhamaka) January 12, 2026
The video is staged or not, this is true in many households. Give good nutrition to your kids pic.twitter.com/YIpyxfbRPT
हा व्हिडीओ शेअर करत वीनीत के यांनी एक्सवर म्हटलंय की, "आजचा सर्वात दुःखद व्हिडिओ आहे.कृपया मुलांना पौष्टिक आहार द्या."व्हिडिओमध्ये दिसतंय की, शाळेतील मुलांची डबा खाण्याची वेळ असते. त्यावेळ अनेक मुलं फास्ट फूड खाताना दिसतात.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स मुलांच्या पालकांनाच दोष देत आहेत.काही लोक आईला जबाबदार ठरवत आहेत.'फक्त आईला दोष देऊ नका',असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> Akola News: "तुझ्या नवऱ्यात काही दम नाही", घरात कोणी नसताना सासऱ्याने किचनमध्ये सुनेला स्पर्श केला, दीरानेही..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world