Mustard Oil Benefits For Hair: केसगळती रोखायची आहे? केसांचे तुटणे कमी करायचे आहे? केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अनेकांनी तुम्हाला मोहरीचे तेल लावण्याचा सल्ला दिला असेल. पण केसांना मोहरीचे तेल लावल्याने नक्की काय होते? कोणते फायदे मिळतील? हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत डॉ. राम अवतार यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
केसांना रोज मोहरीचे तेल लावल्याने काय होते?| Mustard Oil Benefits For Hair
डॉक्टर राम अवतार यांनी सांगितले की, मोहरीच्या तेलामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. हे गुणधर्म तुमच्या केसांना कोंडा (Dandruff), केस गळणे आणि केस अकाली पांढरे होणे यासारख्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.
मोहरीचे तेल कोणी लावायला हवे?
चमकदार केस: केसांना चमक हवी असेल तर मोहरीचे तेल लावावे. मोहरीच्या तेलामध्ये यामध्ये ओलिक ॲसिड (Oleic Acid) आढळते, जे केसांची नैसर्गिक चमक परत मिळवून देण्यास मदत करते.
(नक्की वाचा: Mosquito Control: पावसाळ्यात घराला मच्छरपासून कसं वाचवावं? आजारांपासून दूर राहण्यासाठी फॉलो 'या' 5 टिप्स)
कोरड्या केसांसाठी उपयुक्त: ज्या लोकांचे केस कोरडे (Dry) असतात, त्यांच्यासाठीही हे तेल खूप चांगले आहे. यामध्ये अल्फा फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते, जे केसांना फ्रेश आणि बाउन्सी लुक देण्यास मदत करते.
केस तुटण्याच्या समस्येवर गुणकारी: ज्यांचे केस खूप तुटत आहेत, त्यांच्यासाठीही हे तेल उत्तम मानले जाते. या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. ज्यामुळे केसांची चांगली वाढत होते.
कोंड्याची समस्या असणाऱ्यांसाठी मोहरीचे तेल वरदानापेक्षा कमी नाही, असेही डॉ. राम अवतार यांनी सांगितले.
मोहरीचे तेल केसांमध्ये कसे लावावे?
- मोहरीचे तेल हलके कोमट (गरम) करून घ्या.
- आता केसांच्या मुळांशी तेल लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
- तेल केसांना साधारण 40 मिनिटे तसेच लावून ठेवा.
- त्यानंतर सौम्य (Mild) शॅम्पूने डोके स्वच्छ धुवून घ्या.
तज्ज्ञांविषयी माहिती:
आयुर्वेदाचार्य आणि योग गुरू डॉ. राम अवतार (Prof. Dr. Ram Avtar) हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे योग, आयुर्वेद, नाडी विज्ञान आणि न्युरोथेरपी क्षेत्रात 38 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा दांडगा अनुभव आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world