
Naraka Chaturdashi 2025 Date And Time: आश्विन वद्य चतुर्दशी तिथीला 'नरकचतुर्दशी' असे म्हणतात. या दिवसाला काली चतुर्दशी, छोटी दिवाळी ( Choti Diwali 2025) आणि नरक निवारण चतुर्दशी असेही म्हटले जाते. याच दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि सोळा सहस्त्र राजकन्यांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले, श्रीकृष्णाने असुरी शक्तीवर विजय मिळवला म्हणून या दिवसास नरकचतुर्दशी (Naraka Chaturdashi 2025) म्हणतात. नरकचतुर्दशीला पहाटे उठून सुवासिक तेल/ तिळाचे तेल आणि उटणे अंगाला लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. यंदा कधी नरकचतुर्दशी कधी आहे? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त आणि त्याचे फायदे यासह सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया...
यंदा नरकचतुर्दशी कधी आहे?| Naraka Chaturdashi 2025 Date | When Is Naraka Chaturdashi 2025
यंदा 20 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आहे.
चतुर्दशी तिथी कालावधी | Chaturdashi 2025 Tithi Duration
चतुर्दशी तिथी प्रारंभ (Chaturdashi Tithi Begins) : 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.51 वाजता
चतुर्दशी तिथी समाप्त (Chaturdashi Tithi Ends) : 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता
अभ्यंगस्नानाचा मुहूर्त | Abhyanga Snan 2025 Shubh Muhurat
20 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5.26 वाजेपासून ते सकाळी 6.34 वाजेपर्यंत अभ्यंगस्नानाचा मुहूर्त आहे.
अभ्यंगस्नान आणि कारीट फोडण्याची परंपरा (Abhyanga Snan 2025)
नरकचतुर्दशी दिवशी पहाटे उठूनअंगाला तेल आणि त्यानंतर उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. अभ्यंगस्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीच्या रोपाजवळ कारीट फळ फोडावे. डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीटाचे फळ फोडण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला, त्याच्या वधाची आठवण तसेच नरकासुराचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जाते. कारीट हे लहान आणि चवीला कडू फळ आहे. ते फोडून त्याची थोडीशी चव घेऊन फळाची बी कपाळावर लावली जाते. यानंतर फराळाचा आस्वाद घेतला.
अभ्यंगस्नान करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे, पाहा हा व्हायरल व्हिडीओ (Abhyanga Snan Process Viral Video)
अभ्यंगस्नानाचे फायदे फायदे (Abhyanga Snan Benefits)1. वात दोष संतुलन
तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीराचा मसाज केल्यास शरीरातील वात दोष संतुलित होण्यास मदत मिळते.
2. रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते3. त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतोअभ्यंगस्नानामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते, त्वचेला पोषणतत्त्वांचाही पुरवठा होतो.
4. मानसिक ताण कमी होईलअभ्यंग स्नानामुळे शरीराच्या स्नायूपेशींना आराम मिळतो, हाडे मजबूत होतात. तसेच मानसिक शांतताही लाभते.
(नक्की वाचा: Happy Diwali 2025: दिव्यांचा सोहळा, लक्ष्मीच्या आगमनाने तुमचे नशीब उजळो; दिवाळीच्या पाठवा खास शुभेच्छा)
दिवाळी स्पेशल रांगोळी डिझाइन | Diwali 2025 Special Rangoli Design फुलांची सुंदर रांगोळीरांगोळीचे सुंदर डिझाइन
दिव्याच्या डिझाइनची रांगोळी
(नक्की वाचा: Happy Diwali 2025 Wishes: दिव्यांचा सण तुमच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणो, दिवाळी सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world