
Quitting Sugar Side Effects: निरोगी राहण्यासाठी आज प्रत्येकजण कित्येक उपाय करत असतात. फिट राहण्याचे ट्रेंड देखील कायम बदलत असतात, हल्ली बहुतांश लोक साखर खाणे पूर्णपणे बंद करत आहेत. विशेषतः मधुमेह आणि वजन वाढण्याच्या भीतीने लोक मिठाई, साखरयुक्त पेय आणि साखर पूर्णपणे खाणे टाळत आहेत. पूर्णपणे साखर खाणे बंद करणे बहुतांश वेळेस शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. साखर हळूहळू आणि योग्य पद्धतीने खाणे बंद न केल्यास कित्येक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. डाएटमधून साखर पूर्णपणे वर्ज्य करण्याचे दुष्परिणाम आणि हाय शुगर लेव्हलची लक्षणे जाणून घेऊया...
अचानक साखर खाणे सोडल्यास होऊ शकतात हे पाच दुष्परिणाम (Side Effects of Suddenly Quitting Sugar)
1. थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक साखर खाणे बंद करते तेव्हा शरीरातील ऊर्जेची पातळी खालावते आणि थकवा जाणवू लागतो. मेंदूला देखील ग्लुकोजची आवश्यकता असते, जे साखरेद्वारे मिळते.
(नक्की वाचा: आंब्यासोबत चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी, अन्यथा आरोग्यासाठी ठरेल विष)
2. मूड स्विंग आणि चिडचिडेपणा
साखरेमुळे मेंदूमध्ये डोपामाइन हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत मिळते. अचानक साखर खाणे बंद केल्यास मूडमध्ये वारंवार बदल होऊ लागतात, चिडचिड होणे आणि नैराश्यासारखी लक्षणेही दिसू लागतात.
3. डोकेदुखी आणि ब्रेन फॉग
साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यानंतर डोकेदुखी, चक्कर येणे, ब्रेन फॉग यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
4. झोपेमध्ये अडथळे निर्माण होणे
साखरेमुळे शरीरातील स्लीप हार्मोन मेलाटोनिनवर परिणाम होतो. अचानक साखर खाणे बंद केल्यास झोप येण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
(नक्की वाचा: Health Benefits: सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी डाळिंब खाण्याचे फायदे, ज्याची तुम्ही केली नसेल कल्पना)
5. वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणे
अचानक साखर खाणे बंद केल्यास वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. यामुळे काही लोक जंक फुड खाणे सुरू करतात, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
साखर किती प्रमाणात खाणे योग्य ठरेल? (How Much Sugar Is Safe?)
जागतिक आरोग्य संघटनेनुसार(WHO), एखाद्या व्यक्तीने दरदिवशी एकूण कॅलरीजपैकी पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात साखरेचे सेवन करावे. हे प्रमाण सरासरी 25 ग्रॅम किंवा सहा चमचे साखर इतके असू शकते.
(नक्की वाचा: Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन)
शरीरातील हाय शुगरची लक्षणे
- वारंवार लघवी होणे
- तहान लागणे
- थकवा आणि सुस्तपणा जाणवणे
- स्पष्ट न दिसणे
- डोकेदुखी आणि चिडचिडेपणा होणे
- जास्त भूक लागणे पण वजन कमी होणे
- जखमा भरण्यासाठी वेळ लागणे
साखर खाणे पूर्णपणे बंद करण्याऐवजी काय करावे?
- साखर खाणे पूर्णपणे बंद करण्याऐवजी हळूहळू साखरेचे प्रमाण कमी करावे.
- नैसर्गिक साखर उदाहरणार्थ फळं, खजूर, गूळ इत्यादी गोष्टींचा मर्यादित प्रमाणात डाएटमध्ये समावेश करावा. - प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, मिठाई, साखरयुक्त पेये इत्यादी टाळावे.
- गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सुकामेवा खावा.
- पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करावा.
साखर खाणे पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही, मर्यादित स्वरुपात साखर खाणे आवश्यक आहे. म्हणून हळूहळू करून साखरेचे प्रमाण कमी करावे, अन्यथा मधुमेह किंवा आरोग्याशी संबंधित अन्य समस्या निर्माण होऊ शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world