How To Get Rid Of Rats: तुमच्या घरातही उंदीर झाले आहेत का? उंदरांच्या समस्येतून सुटका कशी मिळवावी? यावर उपाय शोधताय का. छोटा मोठा कोणत्याही प्रकारचा उंदीर कोणालाच घर किंवा दुकानामध्ये नको असतो. उंदीर पळवण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक उपाय जाणून घेऊया...
उंदीर पळवण्यासाठी 5 घरगुती उपाय जाणून घेऊया...
1. पुदिना (Mint): पुदिन्याचा गंध उंदीर मुळीच सहन करू शकत नाही.
उपाय : कापसाच्या बोळ्यावर पुदिन्याचे काही थेंब सोडा आणि किचन, स्टोअर रुम किंवा ज्या ठिकाणी उंदरांचा वावर आहे, तेथे हा कापूस ठेवा. पुदिन्याच्या वासाने उंदीर पळून जातील.
2. लाल तिखट पावडर
उपाय : ज्या ठिकाणी उंदरांचा वावर आहे, तेथे लाल तिखट पावडर शिंपडा. दुकानातील उंदीर पळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता.
3. कांदा आणि लसूण : लसूण आणि कांदा छोट्या-छोट्या आकारात चिरून एका कापडात बांधा आणि उंदरांचा वावर असलेल्या ठिकाणी ठेवा.
(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपण्यापूर्वी केवळ 1 चमचा खा ही गोष्ट, इतकी गाढ झोप येईल की अलार्मही ऐकू येणार नाही)
4. तेजपत्ता (Bay Leaf) : तेजपत्ता उंदरांना आकर्षित करते. पण त्यांच्यासाठी तमालपत्राची चव विषासारखी असते. रात्री झोपताना किचनच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तमालपत्र ठेवा.
5. फिनाइल आणि कापूर: उंदरांना फिनाइल आणि कापूरचा तीव्र स्वरुपातील रासायनिक वास आवडत नाही.
उपाय: ज्या ठिकाणी उंदीर आहेत तेथे कापराच्या गोळ्या ठेवा. फिनाइलच्या मदतीने घर नेहमी स्वच्छ ठेवा.
(नक्की वाचा: Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय)
बाजारामध्ये कोणते पर्याय उपलब्ध असतात?
उंदीर पळवण्यासाठी औषध
उंदीर पळवण्यासाठी बाजारामध्ये कित्येक प्रकारची औषधं उपलब्ध आहेत, पण घरामध्ये लहान मुलं आणि पाळीव जनावर असल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
उंदीर पळवण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन- बाजारात काही इलेक्ट्रॉनिक मशीनही उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून उंदराच्या समस्येतून सुटका मिळवली जाऊ शकते.
- याव्यतिरिक्त घर नियमित स्वच्छ ठेवण्याकडेही लक्ष द्यावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

