जाहिरात

Navratri Day 2 Colour: नवरात्रीचा दुसरा दिवस: लाल रंग, ब्रह्मचारिणी देवीला हा नैवेद्य अर्पण केल्यास होईल कृपा

Navratri Day 2 Brahmacharini Mata Puja Vidhi: ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनात त्याग, सदाचार आणि वैराग्य भावना वाढीस लागते.

Navratri Day 2 Colour: नवरात्रीचा दुसरा दिवस: लाल रंग,  ब्रह्मचारिणी देवीला हा नैवेद्य अर्पण केल्यास होईल कृपा
मुंबई:

Navratri Day 2| Red Color: देशभरात सुरू असलेल्या शारदीय नवरात्रीच्या (Navratri) उत्सवाचा आज, 23 सप्टेंबर रोजी दुसरा दिवस आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला आणि प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्त्व आहे. या 9 दिवसांसाठी 9 वेगवेगळे रंग असून या रंगाचेही महत्त्व आहे. आज 23 सप्टेंबर असून मंगळवार आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस असून हा दिवस देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाचा दिवस असतो.  हे रूप तप, संयम आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग उत्साह, प्रेम आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो.  देवीचे ब्रह्मचारिणी रूप तपश्चर्या, कठोर परिश्रम आणि निष्ठेने ध्येय साध्य करण्याची शिकवण देते.

नक्की वाचा: 9 दिवस बसायचं नाही, उभं राहूनच झोपतात; सातारच्या पांडे गावातील उभ्याच्या नवरात्रीची अनोखी परंपरा

विद्यार्थ्यांनी आराधना केल्यास मिळेल विशेष फळ

ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनात त्याग, सदाचार आणि वैराग्य भावना वाढीस लागते. हा दिवस खासकरून विद्यार्थी आणि कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो देवीची आराधना केल्यास शिक्षणात आणि कामामध्ये यश मिळते असे मानले जाते. लाल रंगाचा संबंध ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाशी जोडलेला आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते अशी मान्यता आहे. हा रंग शक्तीचेही प्रतीक मानला जातो, शक्ती ही फक्त आपले बळ दाखवण्यासाठी नाही तर सनातन सन्मार्गावर चालत राहण्यासाठी उर्जा मिळावी यासाठीहीचीही ही शक्ती असते. 

Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या

(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)

देवीला अर्पण करा पांढऱ्या रंगाचे फूल

आजच्या दिवशी पूजा करताना ब्रह्मचारिणी देवीला पांढऱ्या रंगाची फुले अवश्य वाहावीत. ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवला जातो. देवीला लाल रंगाची साडी, कुंकू आणि इतर शृंगाराच्या वस्तू अर्पण करण्याचीही प्रथा आहे. या पूजा विधीमुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. ब्रह्मचारिणी देवीच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून, ती साधकाला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग दाखवते. देवीची आराधना करण्यासाठी या मंत्राचा उच्चारही करणे लाभदायक ठरू शकते

Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर

(नक्की वाचा: Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर)

मां ब्रह्मचारिणी मंत्र
दधाना करपद्माभ्याम्, अक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि, ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।
ॐ ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्यै नम:
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

कामाक्षी मंदिरातही नवरात्रौत्सवाचा उत्साह

नवरात्रौत्सव हा विविध संस्कृतींचा मिलाफ करणारा अनोखा उत्सव असल्याचे कांची कामकोटी पीठाचे विजयेंद्र सरस्वती यांनी म्हटले आहे. नवरात्रीचा उत्सव कामाक्षी देवीच्या मंदिरातही मोठ्या उत्सातात साजरा केला जातो.  सुमारे 2,500 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या या मंदिरातील देवीचा उत्सव हा नेत्रदीपक असा असतो.  विजयेंद्र सरस्वती यांनी म्हटले की, अंबाजी, कामाख्या, आणि विंध्यवासिनी ही देवीच्या उपासनेची प्रमुख शक्तीपीठे आहेत आणि त्याचप्रमाणे कांचीपुरम येथील कामाक्षी देवीचे मंदिर हे सुद्धा देवीच्या उपासनेचे एक केंद्र आहे. 'ललिता सहस्रनाम' चा संदर्भ देत ते म्हणाले की, केवळ 'कामाक्षी' हे नाव फार पवित्र आणि सुंदर नाव असून केवळ या नामोल्लेखानेच भक्तांवर देवीमाता प्रसन्न होते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com