जाहिरात

Free FASTag: भन्नाट योजना! आता मिळणार 1000 रुपयांचं FASTag फ्री; फक्त एक काम करायचं....

प्रवाशाच्या FASTag खात्यात 1,000 रुपये जमा केले जाणार आहेत. ही रक्कम रोख स्वरूपात न देता थेट FASTag वॉलेटमध्ये जमा केली जाईल, ज्याचा वापर पुढील टोल पेमेंटसाठी करता येईल.

Free FASTag: भन्नाट योजना! आता मिळणार 1000 रुपयांचं FASTag फ्री; फक्त एक काम करायचं....

Free FASTag Money Scheme:  महामार्गावर वाहन चालकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAIकडून विविध सेवा, सुविधा पुरवल्या जातात. लांब पल्ल्याच्या प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून टोल प्लाझावर स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र अनेकदा ही स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. तिथली दुर्गंधी पाहून प्रवाशांना मनस्ताप होतो. मात्र आता अशाच अस्वच्छ स्वच्छतागृहांसाठी NHAIने एक महत्त्वाचा नियम बनवला आहे. 

आता टोल प्लाझावरील अस्वच्छतेचा फटका केवळ प्रवाशांनाच बसणार नाही, तर संबंधित टोल चालकालाही बसेल. जर तुम्हाला प्रवासात एखाद्या टोलवर गलिच्छ टॉयलेट दिसले, तर त्याचा फोटो काढून तुम्ही अधिकृत पोर्टलवर तक्रार करू शकता. महत्त्वाचं म्हणजे तक्रार योग्य ठरल्यास संबंधित प्रवाशाच्या FASTag खात्यात 1,000 रुपये जमा केले जाणार आहेत. ही रक्कम रोख स्वरूपात न देता थेट FASTag वॉलेटमध्ये जमा केली जाईल, ज्याचा वापर पुढील टोल पेमेंटसाठी करता येईल.

Toll Rules: टोल प्लाजाजवळ राहणाऱ्यांना टोल पूर्णपणे फ्री असतो? NHAI ने सांगितलं 'आय कार्ड'च्या नियमाचं सत्य

गलिच्छ टॉयलेटचा फोटो काढा आणि जिंका 1000 चे FASTag रिचार्ज!

टोलच्या नियमांसोबतच NHAI ने राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छता राखण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखी मोहीम सुरू केली आहे. महामार्गावरील प्रवाशांना स्वच्छ प्रसाधगृहांची सुविधा मिळावी यासाठी 30 जून 2026 पर्यंत 'क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज' सुरू करण्यात आले आहे.

जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला कोणत्याही टोल प्लाजावर अस्वच्छ किंवा गलिच्छ टॉयलेट दिसले, तर तुम्ही त्याची तक्रार करून थेट बक्षीस मिळवू शकता, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ने दिली. 

(नक्की वाचा-  Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई)

To enhance commuter convenience and maintain high hygiene standards across National Highways, #NHAI is conducting the ‘#CleanToiletPictureChallenge' till 30th June 2026.

National Highway users are encouraged to report any unclean toilet facilities at Toll Plazas.

➡️ Upload… pic.twitter.com/9ruH3kQOmN

— NHAI (@NHAI_Official) June 12, 2026

स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे? 

राजमार्ग यात्रा ॲप : प्रवाशांना आपल्या मोबाईलमध्ये 'राजमार्ग यात्रा' ॲपचे नवीन व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.
लाईव फोटो अपलोड: ॲपच्या माध्यमातून संबंधित गलिच्छ टॉयलेटचा फोटो (लोकेशनसह - Geo-tagged) अपलोड करावा लागेल.
माहिती भरणे आवश्यक: तक्रार नोंदवताना प्रवाशाला आपले स्वतःचे नाव, अचूक लोकेशन, वाहन क्रमांक (VRN) आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.
1000 चे बक्षीस: प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ज्यांची माहिती अगदी अचूक आणि योग्य असेल, अशा निवडक नागरिकांना प्रोत्साहन म्हणून 1000 रुपयांचे मोफत FASTag रिचार्ज बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com