जाहिरात

Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई

Mumbai Crime News: बँकॉकहून मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या 28 वर्षीय मॉडेल हर्षा सनीला एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) अटक केली आहे.

Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई

ऋतिक गणकवार, मुंबई

ग्लोबल ड्रग्ज रॅकेट आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीचे धागेदोरे पुन्हा एकदा ग्लॅमर जगताशी जोडले गेले आहेत. बँकॉकहून मुंबईत अत्यंत महागड्या आणि उच्च दर्जाच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या एका 28 वर्षीय मॉडेलला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हर्षा सनी असे या अटक करण्यात आलेल्या मॉडेलचे नाव असून, ती 2025 च्या प्रसिद्ध 'मिसेस केरळ' सौंदर्य स्पर्धेतील अंतिम स्पर्धकांपैकी एक होती. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या या धडक कारवाईत तब्बल 22.82 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

ट्रॉली बॅग उघडली अन् कस्टम अधिकारी चक्रावले!

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हर्षा सनी ही 10 आणि 11 जूनच्या मध्यरात्री बँकॉकहून एअर इंडियाच्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली होती. विमानतळावर उतरल्यानंतर तिच्या संशयास्पद हालचालींमुळे एआययूच्या (AIU) अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

गुप्त कप्पे आणि पाकिटे 

अधिकाऱ्यांनी तिला थांबवून तिच्या सामानाची कसून झडती घेतली. तिची ट्रॉली बॅग तपासली असता, त्यात लपवून ठेवलेली 12 व्हॅक्यूम-सील केलेली मोठी पाकिटे आढळून आली. ही पाकिटे फोडल्यानंतर त्यात गडद हिरव्या रंगाचा वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. कस्टम्सच्या ड्रग्ज शोधक पथकाने एनडीपीएस टेस्ट किटद्वारे जागेवरच तपासणी केली असता, ती वाळलेली अमली गांजाची फुले आणि कळ्या असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हायड्रोपोनिक ड्रग्जची किंमत 11 कोटी 82 लाख रुपयांहून अधिक आहे.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: पैशांपुढे नातं हरलं! मुलाने भररस्त्यात वडिलांना चाकूने वार करून संपवलं)

मॉडेल हर्षा सनीला न्यायालयीन कोठडी

परदेशातून छुप्या मार्गाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळेच सीमाशुल्क विभागाने हर्षा सनी हिला अमली पदार्थ विरोधी कायदा म्हणजेच NDPS कायद्यांतर्गत तात्काळ अटक केली. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटमध्ये तिची भूमिका काय आहे आणि ही खेप मुंबईत कोणाला पोहोचवली जाणार होती, याचा शोध घेण्यासाठी तिची कसून चौकशी करण्यात आली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com