जाहिरात

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे? काय करावे, काय टाळावे, महत्त्व आणि उपाय वाचा

Putrada Ekadashi Vrat 2025 Date And Puja Vidhi: पौष महिन्यातील पुत्रदा स्मार्त एकादशी व्रत करण्याची योग्य पद्धत, उपाय आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया...

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे? काय करावे, काय टाळावे, महत्त्व आणि उपाय वाचा
"Pausha Putrada Ekadashi Vrat 2025: पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याची योग्य पद्धत"
Canva

Putrada Ekadashi Vrat 2025 Importance: सनातन परंपरेनुसार भगवान विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्यातील एकादशीचे व्रत करणे फलदायी मानले जाते. पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. तर वैष्णव परंपरेशी जोडलेले भाविक 31 डिसेंबर रोजी एकादशीच्या व्रताचे पालन करतील. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी व्रताची पूजा, विधी, नियम, महत्त्व आणि महाउपायांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

पुत्रदा एकादशी 2025 व्रत करण्याची योग्य विधी | Putrada Ekadashi Vrat 2025 Importance

  • मुलांच्या सुख-समृद्धी आणि सौभाग्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्या भाविकांनी एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथीपासूनच व्रताच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात करावी आणि सूर्यास्तानंतर जेवण करणं टाळावे. 
  • पुत्रदा एकादशी दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. शक्य असल्यास गंगा स्नान करावे अन्यथा घरामध्ये स्नान करताना पाण्यात गंगाजल मिक्स करावे. 
  • हिंदू मान्यतेनुसार भाविकाने एकादशी व्रताच्या दिवशी श्री हरींना प्रिय असणाऱ्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तसेच पूजा सामग्रीमध्ये पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई इत्यादी गोष्टींचा समावेश करावा. 
  • स्नान-ध्यान केल्यानंतर सर्वप्रथम श्री हरींचे स्वरूप मानले जाणाऱ्या भगवान श्री सूर्य नारायणांना अर्घ्य अर्पण करावे. यानंतर पुत्रदा एकादशी व्रत विधीवत करण्याचा संकल्प करावा. 
  • पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी देवघरात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात चौरंग मांडावा, त्यावर पिवळ्या रंगाचे कापड अंथरावे, त्यावर भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. 
  • मूर्तीवर गंगाजल, पिवळ्या रंगाचे चंदन, केशर, पुष्प, धूप, दीप, फळ, मिठाई इत्यादी गोष्टी अर्पण करून पूजा करावी. 
  • एकादशी व्रत तोपर्यंत अपूर्ण असेल जोवर तुम्ही श्री हरींना तुळस अर्पण करत नाही, पण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पाने तोडू नये. व्रताच्या एक दिवस आधीच सर्व तयारी करून ठेवावी. 
  • भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्यानंतर एकादशी व्रताची कथा ऐकावी किंवा कथेचं पठण करावं. तुळशीच्या माळेने 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा अधिकाधिक जप करावा. 
  • पुत्रदा एकादशी व्रताच्या पूजेनंतर आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करून स्वतः देखील प्रसाद ग्रहण करावा. 
  • पुत्रदा एकादशीच्या दिवशी भोजन करू नये, व्रत नसले तरीही भात तसेच तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. 
  • पुत्रदा एकादशी व्रताचे नियमानुसार पारण करावे, दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर स्नान-ध्यान केल्यानंतर व्रताचे पारण करावे. 

(नक्की वाचा: Pausha Putrada Ekadashi 2025: दानधर्म ते मंत्रापर्यंतचे 5 महाउपाय, भगवान विष्णूंच्या कृपेनं इच्छा होतील पूर्ण)

पुत्रदा एकादशी 2025 व्रताचा महाउपाय | Putrada Ekadashi Vrat 2025 Upay 

  • पुत्रदा एकादशी व्रताचे पुण्यफळ मिळवण्यासाठी व्रताचे पारण करताना एखाद्या ब्राह्मणास आपल्या क्षमतेनुसार फळं, अन्न, वस्त्र आणि धन इत्यादी गोष्टी दान कराव्या. 
  • पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी स्वरुप मानल्या जाणाऱ्या तुळशी वृंदावनाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. 
  • पुत्रदा एकादशी व्रताच्या श्री ​हरींची पूजा करताना शंखनाद नक्की करावा, तुमच्याकडे दक्षिणवर्ती शंख असेल तर त्यात जल भरून श्री हरींचे विशेष पद्धतीने अभिषेक करावा. 
  • श्री विष्णु सहस्त्रनाम किंवा संतान गोपाल स्तोत्राचे पठण करावे. 

(नक्की वाचा: Paush Putrada Ekadashi 2025 Date: पुत्रदा एकादशी कधी आहे, 30 की 31 डिसेंबर? योग्य तारीख,शुभ मुहूर्त जाणून घ्या

Latest and Breaking News on NDTV

पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व | Putrada Ekadashi Dharmik Importance

  • हिंदू मान्यतेनुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीचे म्हणजे पुत्रदा स्मार्त एकादशीचे व्रत विधीवत केल्यास अपत्य सुख प्राप्ती होते, असे म्हणतात. 
  • तसेच ज्यांना मुलबाळ आहे, त्यांच्या मुलांच्या सुख-सौभाग्यात वाढ होते, अशीही मान्यता आहे. 
  • पुत्रदा एकादशी व्रतामुळे मुलांना सर्व प्रकारचे शुभ फळ मिळण्यासह समृद्धी प्राप्त होते, असेही म्हणतात.
  • पुत्रदा एकादशी व्रत केल्यास भाविकास अश्वमेध यज्ञ केल्यासमान पुण्यफळ मिळते तसेच सर्व पापदोषांमधून मुक्तता मिळते,अशी मान्यता आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com