Paush Putrada Ekadashi 2025 Date And Shubh Muhurat: सनातन परंपरेत भगवान विष्णू यांना विश्वाचे पालनकर्ते मानले जाते. भगवान विष्णू यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख-अडचणी दूर होऊन इच्छा पूर्ण होतात,असे म्हणतात. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत करणं अत्यंत फलदायी मानले जाते. 2025 वर्षातील शेवटची एकादशी म्हणजेच पौष महिन्यातील पुत्रदा स्मार्त एकादशी यंदा कधी आहे? सनातन परंपरेत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व काय आहे? व्रताचे पारण कधी आणि कसे करावे? पौष पुत्रदा स्मार्त एकादशी व्रताची नेमकी तारीख, पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पौष पुत्रदा स्मार्त एकादशी व्रताची तिथी आणि शुभ मुहूर्त | When is Paush Putrada Ekadashi 2025?
भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळणारी पौष पुत्रदा स्मार्त एकादशीचा व्रत यंदा 30 डिसेंबर की 31 डिसेंबर रोजी आहे, यावरून भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय.
पौष पुत्रदा स्मार्त एकादशी 2025 तिथी | Paush Putrada Ekadashi 2025 Tithi Time
पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.50 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजता तिथी समाप्त होईल. यानुसार 30 डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण करावे.
पौष पुत्रदा स्मार्त एकादशी 2025 व्रत पारण मुहूर्त | Paush Putrada Ekadashi 2025 Vrat Paran Time
31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 01:48 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेदरम्यान व्रताचे पारण करू शकता. वैष्णव परंपरेनुसार 31 डिसेंबर रोजी एकादशीचे व्रत करणारे भाविक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.12 वाजेपासून ते सकाळी 9.24 वाजेदरम्यान व्रताचे पारण करू शकता.
पौष पुत्रदा एकादशी व्रताची पूजा विधी | Paush Putrada Ekadashi 2025 Puja
- पौष पुत्रदा एकादशी व्रत करण्यासाठी भाविकांनी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नानध्यान करावे.
- एकादशी व्रत विधीवत करण्याचा संकल्प करावा.
- शुभ मुहूर्तावर भगवान विष्णुंना हळद, चंदन, केसर इत्यादी गोष्टींचा टिळा लावून फळं-फुल, धूप-दीप नैवेद्य अर्पण करावे.
- एकादशी व्रताच्या दिवशी पूजा करताना श्री हरी कथेचं पठण करण्याचे किंवा ऐकण्याचे अत्यंत महत्त्व आहे.
- श्री हरीची आरतीही म्हणावी, जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करावे आणि स्वतःही प्रसाद ग्रहण करावा.
- व्रताच्या दिवशी अन्नग्रहण करू नये केवळ फलाहार करावा.
- व्रताच्या दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तवार पारण करावे.
पौष पुत्रदा एकादशी व्रताचे धार्मिक महत्त्व | Importance of Paush Putrada Ekadashi 2025
- हिंदू मान्यतेनुसार, संततीची इच्छा असणाऱ्यांनी पौष पुत्रदा एकादशी व्रत करणं फलदायी मानले जाते.
- पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास आनंद, शांती, सौभाग्य मिळते; असेही म्हणतात.
- भगवान विष्णू यांचा आशीर्वादही मिळतो.
प्रश्न 1: पौष महिन्यातील पुत्रदा स्मार्त एकादशी कधी आहे? | When is Paush Putrada Ekadashi 2025?
उत्तर : वर्ष 2025मध्ये पौष पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर रोजी आहे. (In the year 2025 Paush Putrada Ekadashi Will Be Observed On 30th December 2025, Tuesday)
प्रश्न 2: पौष पुत्रदा एकादशी कोणत्या देवतेला समर्पित आहे? | Which Deity Is Paush Putrada Ekadashi 2025 Dedicated To?
उत्तर : पौष पुत्रदा एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते.
प्रश्न 3: पौष पुत्रदा एकादशीला 2025 कोणत्या गोष्टींचं दान करावे? | What Should Be Donated To Paush Putrada Ekadashi 2025?
उत्तर : पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्न, धान्य आणि वस्त्र दान करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world